शार्दुलची डरकाळी, पंजाब स्पर्धेबाहेर

By admin | Published: May 15, 2017 07:05 AM2017-05-15T07:05:20+5:302017-05-15T07:05:20+5:30

रायजींग पुणे सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईकर शार्दुलच्या डरकाळीने किंग्ज पंजाबला थेट

Shardul, out of Punjab Championship | शार्दुलची डरकाळी, पंजाब स्पर्धेबाहेर

शार्दुलची डरकाळी, पंजाब स्पर्धेबाहेर

Next

आकाश नेवे / आॅनलाईन लोकमत

पुणे, दि. 15 - रायजींग पुणे सुपर जायंट्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात गहुंजे स्टेडिअमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईकर शार्दुलच्या डरकाळीने किंग्ज पंजाबला थेट स्पर्धेबाहेर केले आहे. गेल्या काही सामन्यांत सलग विजय मिळवत प्ले आॅफच्या स्पर्धेत राहणाऱ्या किंग्ज पंजाबला या सामन्यात पुण्या विरोधात विजय मिळवणे गरजेचे होते. पंजाब पुण्याला कडवी टक्कर देईल असा सगळ््यांचाच होरा होता. मात्र मुळच्या मुंबईच्या असलेल्या शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३ बळी घेत पंजाबच्या गोलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याने शॉन मार्र्श, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल आणि राहूल तेवतिया यांना बाद केले. तसेच चार षटकांत फक्त १९
धावाच त्याने दिल्या. सामनावीर ठरलेल्या जयदेव उनाडकटने सुरेख मारा करत एक षटक निर्धाव टाकले. त्याने दोन बळी घेतले.
एरवी दमदार सुरूवात करणाऱ्या पंजाबच्या फलंदाजांची हाराकिरी या सामन्यात त्यांना पराभवाकडे घेऊन गेली. सामन्यातील पहिल्या चेंडूवर उनाडकटने गुप्तीलला बाद केले. त्यानंतर अक्षर पटेल वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याने २२ धावा केल्या तर पूर्ण संघाला ७३ धावा करता आल्या. पुणे संघाने आपल्या यशाचे श्रेय गोलंंदाजांना दिले आहे. इम्रान
ताहीरची अनुपस्थिती अ‍ॅडम झाम्पाने जाणवु दिली नाही.
७८ धावांचे माफक लक्ष्य पूर्ण करताना पुणे संघाला फारसे कष्ट पडले नाही. राहूल त्रिपाठी, अजिंक्य रहाणे आणि स्टिव्हन स्मिथ यांनी सहज संघाला विजय मिळवून दिला. इशांत शर्मा याचे हे पूर्ण सत्र बळी विना गेले. या सामन्यातही इशांतला बळी घेता आला नाही. त्याने टाकलेल्या एकमेव षटकांत १२ धावा कुटल्या. या सत्रात इशांतने एकुण १०८ चेंडू टाकले मात्र एकही बळी न
घेण्याची त्याची ही निचांकी कामगिरी ठरली.

Web Title: Shardul, out of Punjab Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.