प्रशासकांसोबत बिंद्रांनी केले अनुभव शेअर

By admin | Published: February 6, 2017 01:33 AM2017-02-06T01:33:54+5:302017-02-06T01:33:54+5:30

बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी चार सदस्यीय प्रशासकांची समिती नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रशंसा केल्यानंतर अनुभवी प्रशासक आय.एस

Share experiences shared by the dancers with the administrators | प्रशासकांसोबत बिंद्रांनी केले अनुभव शेअर

प्रशासकांसोबत बिंद्रांनी केले अनुभव शेअर

Next

चंदीगड : बीसीसीआयच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी चार सदस्यीय प्रशासकांची समिती नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रशंसा केल्यानंतर अनुभवी प्रशासक आय.एस. बिंद्रा यांनी रविवारी आपले अनुभव शेअर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या नव्या प्रशासकांना अनुभवाच्या बोलातून काही शिकायला मिळेल, अशी आशा आहे.
बीसीसीआयच्या माजी प्रमुखांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की,‘भारतीय क्रिकेटच्या स्थितीबाबत मी यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, गेल्या दशकात खेळाला बदनाम करणाऱ्या गिधाडांसोबत मी चर्चा केली. माझ्या लिखाणाचा परिणाम झाल्यामुळे मला आनंद झाला. कारण मी माझ्या जीवनातील चार दशके क्रिकेट प्रशासनामध्ये घालविली आहेत.’
बिंद्रा यांनी पुढे लिहिले की,‘त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या नव्या प्रशासकाला भूतकाळापासून बोध घेता येईल. लाखो चाहत्यांची इच्छा असलेल्या गोष्टीच त्यांनी करायला हव्यात. भारतीय क्रिकेटमध्ये सुशासन आणायला हवे.’
बिंद्रा अनेक वर्षे पंजाब क्रिकेट संघटनेचे (पीसीए) प्रशासक होते. त्यांनी दोन बाबींचा विशेष उल्लेख केला. त्यांनी म्हटले की,‘२००० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने मॅच फिक्सिंगच्या आरोपाचा स्वीकार केला होता आणि मी भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगचा खुलासा केला होता.
त्यावेळी बोर्डाने माझ्यावर बदनामी करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये माजी बाजू योग्य ठरली.’
(वृत्तसंस्था)

Web Title: Share experiences shared by the dancers with the administrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.