शशी, आस्था यांचे शानदार विजय, भारताच्या आस्थाकडून बल्गेरियाची योनुझोवा पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:23 AM2017-11-21T03:23:29+5:302017-11-21T03:23:39+5:30

गुवाहाटी : भारताच्या बाॉक्सर शशी चोप्रा व आस्था पाहवा यांनी एआयबीए विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या दुस-या दिवशी शानदार विजयाची नोंद केली.

Shashi, great win over faith, Yugoslavova of Bulgaria defeated Bulgaria | शशी, आस्था यांचे शानदार विजय, भारताच्या आस्थाकडून बल्गेरियाची योनुझोवा पराभूत

शशी, आस्था यांचे शानदार विजय, भारताच्या आस्थाकडून बल्गेरियाची योनुझोवा पराभूत

Next

गुवाहाटी : भारताच्या बाॉक्सर शशी चोप्रा व आस्था पाहवा यांनी एआयबीए विश्व बॉक्सिंग स्पर्धेच्या दुस-या दिवशी शानदार विजयाची नोंद केली. सोमवारी पहिल्या परीक्षेत ५७ किलो वजन गटात (फिदरवेट) शशी आणि ६९ किलो वेल्टर गटात आस्थाने बाजी माारली.
कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियम भारतीय चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर शशीने उझबेकिस्तानची रखमातोवा डुर्डोनाखोन हिच्यावर ५-० ने मात केली. आस्थाने आक्रमक खेळाच्या बळावर बल्गेरियाची योनुझोवा मेलिस हिच्यावर ५-० ने मात केली. ६० किलो गटाच्या पहिल्या सामन्यात अन्य एक भारतीय बॉक्सर वनलालरियात पुई कडवी झुंज दिल्यानंतर कोरियाच्या आयएम एइजी हिच्याकडून ३-२ ने पराभूत झाली.
इस्तंबूलमध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण जिंकणाºया शशीने प्रतिस्पर्धी खेळाडूला वावच दिला नाही. प्रत्येकी तीन मिनिटांच्या तिन्ही फेºयांमध्ये शशीने वर्चस्व गाजविले. दोन्ही बाजूंनी स्वत:ला हलते ठेवून शशीने ठोशांचा उत्कृष्ट प्रहार करताच पहिल्या फेरीअखेर प्रतिस्पर्धी खेळाडू बॅकफूटवर आली होती.
हिस्सारची खेळाडू असलेली शशी मागच्या वर्षी आंतरविद्यापीठ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॉक्सर बनली होती. दुसºया फेरीत तिने ठोशांंचा प्रहार दुप्पट करीत रिंगणात राज्य गाजविले. तिसºया फेरीत तिची कामगिरी आणखी बहरताच एकतर्फी विजय साकार झाला.
>निकाल (दुसरा दिवस)
(४५ ते ४८ किलो लाईटफ्लाय) : ड्रोवा इमी मारी (बल्गेरिया) वि. वि. क्लटन डॅनियल (आॅस्ट्रेलिया) ५-०, नी युआन (चीन) वि. वि. डेनहोल्म बिली (स्कॉटलंड) ५-०, अल्मेडा ग्लोरिया (फ्रान्स) वि. वि. दुवाल अस्मिता (नेपाल) ५-०, फ्रायर कॅटलिन (आयर्र्लंड) वि. वि. नासू मिसाकी (जपान) ५-०. (५४ किलो बँटमवेट): उझ्का दारिया (पोलंड) वि. वि. फैजुलेवामफ्तुना (उझबेकिस्तान) ५-०, (५७ किलो फिदरवेट) : रोडिनोवा वालेरिया (रशिया)
वि. वि. टीमलिन अ‍ॅमी (इंग्लंड) ५-०, शशी चोप्रा भारत वि. वि.
रखमातोवा डुर्डोनाखोन (उझबेकिस्तान) ५-०. ६० किलो (लाईटवेट) : वनलालरियात पुई (भारत) पराभूत वि. आयएम एइजी (कोरिया) ३-२. ६९ किलो (वेल्टर वेट) : आस्था पाहवा (भारत) वि. वि. योनुझोवा मेलिस (बल्गेरिया) ५-०.
>पहिल्या विजयावर मी खूष आहे. विजय मिळेलच याची खात्री होती. पण प्रतिस्पर्र्धी खेळाडूला गुण मिळवू द्यायचा नाही, असे मनात ठरविले होते. मी सरळ ठोसे मारले आणि त्यात यशस्वी ठरले.’ विजयानंतर आस्थानेदेखील आक्रमकतेमुळे बाजी मारता आली.
- शशी चोप्रा

Web Title: Shashi, great win over faith, Yugoslavova of Bulgaria defeated Bulgaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.