धोनीने घेतल्या शास्त्रीकडून टिप्स
By admin | Published: February 20, 2015 01:44 AM2015-02-20T01:44:55+5:302015-02-20T01:44:55+5:30
पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला विजयाचा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे;
मेलबर्न : आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाला विजयाचा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे; पण काही विभागांत अद्याप सुधारणा करण्याची गरज आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजीतील फॉर्मचाही त्यात समावेश आहे.
बुधवारी सेंट किल्डा जंक्शन ओव्हल मैदानावर सरावसत्रादरम्यान धोनीने संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केली. सरावानतंर धोनी स्केअरलेगला खुर्चीवर बसलेल्या शास्त्रीकडे गेला. चर्चेदरम्यान शास्त्री धोनीला पुलचा फटका मारताना शरीराची हालचाल व समतोल कसा राखायचा, याच्या टिप्स देत असल्याचे दिसून आले. धोनीला गेल्या १० वन-डे सामन्यांत केवळ एकदा अर्धशतकाची वेस ओलांडता आली. काही लढतींत तो सामन्यांत तो चुकीचा फटका खेळून तंबूत परतला.
आश्विन, भुवी फिट; आफ्रिकेविरुद्ध खेळणार
सिडनी : वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि आॅफस्पिनर आऱ आश्विन पूर्णपणे फिट आहेत.हे दोन्ही खेळाडू २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे सामन्यात खेळतील, असे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे़ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर भुवनेश्वर बुधवारी सराव करताना दिसला नव्हता़