शिखर धवनची शतकी खेळी

By admin | Published: September 28, 2015 01:41 AM2015-09-28T01:41:33+5:302015-09-28T01:41:33+5:30

कर्णधार व सलामीवीर शिखर धवनने (नाबाद ११६) शतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी फिट असल्याचे सिद्ध केले. शिखरच्या शतकी

Shikhar Dhawan's century | शिखर धवनची शतकी खेळी

शिखर धवनची शतकी खेळी

Next

बेंगळुरू : कर्णधार व सलामीवीर शिखर धवनने (नाबाद ११६) शतकी खेळी करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी फिट असल्याचे सिद्ध केले. शिखरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी रविवारी १ बाद १६१ धावांची मजल मारली. बांगलादेश ‘अ’ संघाचा पहिला डाव २२८ धावांत गुंडाळणाऱ्या भारत ‘अ’ संघाने प्रत्युत्तरात खेळताना शानदार सुरुवात करीत सामन्यावर पकड मजबूत केली. भारत ‘अ’ संघाला पाहुण्या संघाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी ६७ धावांची गरज असून ७ विकेट शिल्लक आहेत. त्याआधी वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन (४-४५) व आॅफ स्पिनर जयंत यादव (४-२८) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने बांगलादेश ‘अ’ संघाचा डाव ५२.४ षटकांत २२८ धावांत गुंडाळला.
शिखरने श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला उर्वरित दोन कसोटी सामन्यांतून माघारी घ्यावी लागली. यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यातही त्याने शतक झळकावले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर शिखर धवनने पुनरागमन करताना शानदार शतकी खेळी केली. शिखरने शतकांची हॅट््ट्रिक नोंदवली.
भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखरने ११२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ११६ धावा फटकावल्या. त्यात १६ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. शिखरने अभिनव मुकुंदसोबत (३४) सलामीला १५३ धावांची भागीदारी केली. मुकुंदने ७८ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार लगावले. शिखरचा हा ९८ वा प्रथम श्रेणी सामना आहे तर मुकंद ९९ व्या प्रथम श्रेणी सामन्यात खेळत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या बांगलादेश ‘अ’ संघातील एकाही गोलंदाजांना भारत ‘अ’ संघाच्या सलामीच्या जोडीवर छाप सोडता आली नाही. शिखरने आक्रमक पवित्रा स्वीकारताना चौफेर फटकेबाजी केली आणि कारकीर्दीतील २१ वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. शिखरच्या तुलनेत मुकुंदने संयमी फलंदाजी करीत कर्णधाराला योग्य साथ दिली. भारतीय संघाने जवळजवळ प्रति षटक पाचच्या सरासरीने धावा वसूल केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण ३८९ धावा फटकावल्या गेल्या. आज पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी शतकवीर धवनला श्रेयस अय्यर (६) साथ देत होता. त्याआधी,चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या लढतीत बांगलादेशतर्फे शब्बीर रहमानने (नाबाद १२२) शतकी खेळी करीत भारतीय माऱ्याला समर्थपणे तोंड दिले. त्याला शुवागता होम (६२) आणि नासिर हुसेन (३२) यांची योग्य साथ लाभली.(वृत्तसंस्था)

Web Title: Shikhar Dhawan's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.