दिव्यांग श्रद्धाची चमकदार झेप

By admin | Published: October 8, 2016 03:42 AM2016-10-08T03:42:02+5:302016-10-08T03:42:02+5:30

काही वर्षांपूर्वी चंदेरी पडद्याच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींसमोर आलेला इक्बाल आठवतो का

The shining expanse of Divyaan faith | दिव्यांग श्रद्धाची चमकदार झेप

दिव्यांग श्रद्धाची चमकदार झेप

Next


रायपूर : काही वर्षांपूर्वी चंदेरी पडद्याच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींसमोर आलेला इक्बाल आठवतो का... हो तोच इक्बाल जो मूकबधिर म्हणून समाजापासून दूर राहिल्यानंतर, आपल्या हिंमतीच्या जोरावर क्रिकेटमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करतो. अगदी असाच पराक्रम केलाय छत्तीसगडच्या १८ वर्षीय श्रद्धा वैष्णव या महिला क्रिकेटपटूने.
श्रद्धाने आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून छत्तीसगडच्या मुख्य महिला संघात स्थान मिळवताना राष्ट्रीय क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. क्रिकेटची आवड आणि कठोर मेहनतीच्या जोरावर श्रद्धाने आज प्रत्येक खेळाडूसाठी एक आदर्श निर्माण केला असून, तीच्या यशाचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.
मूळची बिलासपूर शहरातील असलेल्या श्रद्धाने वयाच्या १३वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वेगवान गोलंदाजीची आवड असलेल्या श्रद्धाने नंतर फिरकी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करून त्यामध्ये तिने चांगलाच जम बसविला. विशेष म्हणजे, याआधी वेगवान गोलंदाज अंजन भट्टाचार्य याने नियमित राज्य संघाकडून खेळणारा पहिला दिव्यांग खेळाडू म्हणून पराक्रम केला होता. अंजनने बिहारकडून खेळताना १९७० मध्ये रणजी पदार्पण केले होते. त्या वेळी आपल्या पहिल्याच सामन्यात अंजनने २४ धावांत ७ बळी घेताना जबरदस्त छाप पाडली होती.
आता, श्रद्धाकडूनही अशाच धमाकेदार खेळाची अपेक्षा असून, ती यामध्ये नक्की यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. गेल्याच आठवड्यात १५ सदस्यीय राज्य संघामध्ये श्रद्धाची निवड झाली. आज श्रद्धाने मिळविलेल्या यशाचा सर्वांत मोठा आनंद तिच्या पालकांना आहे.
श्रद्धाचे वडील रमेश वैष्णव यांनी जेव्हा श्रद्धा ९० टक्के मूकबधिर असल्याचे कळाले तेव्हा खूप निराश झाल्याचे सांगितले. रमेश म्हणाले की, ‘जेव्हा ती १३ वर्षांची होती तेव्हा लहान भावासह ती क्रिकेट बघायची. एक दिवस तिने गोलंदाजी करण्याची
इच्छा व्यक्त केली. त्यावेळी मी तिला क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात नेले. काही महिन्यांतच तिने मी चांगली फिरकी गोलंदाज होऊ शकते असे सांगितले,’ ‘श्रद्धाने आपल्या कमजोरीला ताकद बनविले. (वृत्तसंस्था)

ती प्रामुख्याने आपल्या फिरकीवर अधिक लक्ष देत होती. याआधी ती मध्यमगती गोलंदाजी करायची, परंतु नंतर ती फिरकी गोलंदाजीकडे वळाली. ती आता वेगवान लेग ब्रेक टाकण्यात पारंगत आहे,’ असे श्रद्धाचे प्रशिक्षक मोहन सिंग ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: The shining expanse of Divyaan faith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.