शिवा थापा पहिल्याच फेरीत पराभूत
By admin | Published: August 11, 2016 11:02 PM2016-08-11T23:02:37+5:302016-08-11T23:02:37+5:30
पहिल्या फेरीत क्यूबाचा रोबिसे रमिरेझ याच्याकडून ५६ किलो वजन गटात २-३ ने पराभूत होताच आॅलिम्पिकमधून बाद झाला.
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 11- दुसरे आॅलिम्पिक खेळणारा २२ वर्षांचा युवा भारतीय बॉक्सर शिवा थापा गुरुवारी पहिल्या फेरीत क्यूबाचा रोबिसे रमिरेझ याच्याकडून ५६ किलो वजन गटात २-३ ने पराभूत होताच आॅलिम्पिकमधून बाद झाला.
या लढतीदरम्यान शिवाच्या डाव्या डोळ्यावर जखम झाली. पहिल्या फेरीत दोन्ही बॉक्सर्स सावध खेळले. दोघेही ज्युनियर गटात खेळल्यामुळे एकमेकांच्या खेळापासून परिचित होते. यूथ विश्व चॅम्पियनशिप तसेच यूथ आॅलिम्पिकच्या अंतिम फेरीत दोघेही परस्परांविरुद्ध लढले होते. आजच्या लढतीत प्रतिस्पर्धी रमीरेझ याने तिन्ही फेऱ्या जिंकल्या. लंडन आॅलिम्पिकमधील फ्लायवेटचा सुवर्ण विजेता रमीरेझने थापावर दोन्ही हातांनी ठोशांचा वार केला. त्याचे फुटवर्क आणि बचाव देखील चांगला होता. चार वर्षांपूर्वी शिवा पहिल्याच फेरीत बाद झाला होता.