व्हॉलिबॉलमध्ये शिवामृत, समावि व शंकरराव मोहिते महाविद्यालय विजयी एस.पी.एम. स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धा
By Admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
अकलूज :
अ लूज : येथील शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या एस.पी.एम. स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धेत शिवामृत दूध संघ, सदाशिवराव माने विद्यालय व शंकरराव मोहिते महाविद्यालय या संघांनी विजय संपादन केला. स्पर्धेचे मार्गदर्शक व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.व्हॉलिबॉलच्या खुल्या गटातील अंतिम स्पर्धेत शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ विरुद्ध स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना या दोन संघात अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीत शिवामृत संघाने ४ गुणांनी आघाडी घेतली तर दुसर्या फेरीत १२ गुणांनी आघाडी घेत निर्विवाद विजय संपादन केला. शिवामृत संघाच्या पंडित माने-देशमुख, डॉ.रमेश पताळे, जहाँगीर सय्यद, गणेश गायकवाड, दीपक पवार, अस्लम पटेल व दत्तात्रय पाटील या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.१४ वर्षे मुले गटात सदाशिवराव माने विद्यालयाने वाघोलीच्या विजयसिंह मोहिते विद्यालयावर मात केली. १७ वर्षे मुले वयोगटात बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस यावर मात करीत सदाशिवराव माने विद्यालयाने विजेतेपद संपादित केले. १९ वर्षे मुले गटात शंकरराव मोहिते महाविद्यालयाला पराभूत करीत सदाशिवराव माने विद्यालयाने विजयावर शिक्कामोर्तब केला. खुल्या गटात शंकरराव मोहिते महाविद्यालयाने रत्नाई कृषी महाविद्यालयावर विजय मिळविला.लंगडी स्पर्धेत ८ वर्षे मुले व मुली गटात सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागाने स.म.शंकरराव मोहिते प्रशालेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.१७ वर्षे मुले वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५० किलो खालील वजनीगटात संदेश जाधव (समावि, अकलूज), ५० किलो खालील वजनीगटात आयुब पठाण (महर्षी प्रशाला, यशवंतनगर), ६२ किलो खालील वजनीगटात मोहसीन सय्यद, ६९ किलो खालील वजनीगटात सत्यजित देशमुख, ८५ किलो वजनीगटात ऋतुराज गायकवाड, ९४ किलो वरील वजनीगटात अमित भोसले (सर्वजण समावि, अकलूज), ७७ किलो खालील वजनीगटात गणेश काळे, ९४ किलो खालील वजनीगटात शुभम पवार (जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर) याने विजय संपादन केला.१७ वर्षे मुली वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४४ किलो खालील गटात कोमल लोंढे (श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर), ४८ किलो खालील वजनीगटात नम्रता लोखंडे, ६९ किलो खालील वजनीगटात विशाखा वाघमारे, ६९ किलोवरील गटात ऐश्वर्या तांबे (लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर), ५३ किलो खालील गटात शीतल कोकाटे-पाटील, ५८ किलो खालील गटात प्रणाली गायकवाड (श्री हनुमान विद्यालय, लवंग), ६३ किलो खालील गटात सुजात मिसाळ (श्री विजयसिंह मोहिते विद्यालय, वाघोली) यांनी विजय मिळविला.१९ वर्षे मुले वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६२ किलो खालील गटात विनायक कवळसकर, ६९ किलो खालील गटात भीमा चव्हाण, ७७ किलो गटात समाधान बंडगर, ८५ किलो खालील गटात समाधान माने, १०५ किलो वरील गटात आकाश एकतपुरे (सर्वजण - समावि, अकलूज), ९४ किलो खालील गटात पांडुरंग बर्वे (कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर), १०५ किलो खालील गटात आशुतोष साठे (महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर) यांनी विजय संपादन केला.१९ वर्षे मुली वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ किलो खालील गटात करुणा सोनवणे (शंकरराव मोहिते महाविद्यालय), ५३ किलो खालील गटात काजल घोगरे (महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर), ५८ किलो खालील गटात ईश्वरी शिर्के (कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर), ६३ किलो खालील गटात रागिणी माने (समावि, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या खुल्या गटात ५६ किलो खालील गटात अविनाश कोकाटे, ६२ किलो खालील गटात योगेश शेंडगे, ६९ किलो अक्षय शेंडगे, ७७ किलो खालील गटात प्रफुल्ल कोलगे, ८५ किलो खालील गटात रामदास अंबुरे, ९४ किलो खालील गटात शेषराज घाडगे (सर्वजण - शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज), १०५ किलो खालील गटात विकास शेंडे, १०५ किलो वरील गटात बलराज झिरपे (रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या खुल्या गटात ४८ किलो खालील गटात करिना शेख, ५३ किलो खालील गटात निकिता मिसाळ, ६३ किलो खालील साक्षी वाघ (जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज), ५८ किलो खालील गटात आशा वाघ, ६९ किलो खालील गटात सारिका जाधव, ७५ किलो खालील गटात चांदनी मुलाणी, ७५ किलो वरील गटात सोनल मदने (सर्वजण: सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.