Breaking News... फेडररला धक्का, उपांत्य फेरीत जोकोव्हिचकडून सरळ सेट्समध्ये पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:32 PM2020-01-30T16:32:43+5:302020-01-30T16:40:14+5:30
या विजयासह जोकोव्हिचने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
सिडनी : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररला धक्का बसला. उपांत्य फेरीत फेडररला दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचने सरळ सेट्मध्ये पराभूत केले. या विजयासह जोकोव्हिचने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने फेडररला ७-६ (७-१), ६-६, ६-३ असे नमवले.
Eyeing off 8️⃣ Australian Open finals and the right to claim sole ownership of the all-time record for most #AusOpen finals 👀@DjokerNole | #AO2020pic.twitter.com/4rFF8wSYXi
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील पहिला सेट चांगलाच रंगला. पहिल्या सेटमध्ये दोघांचे समान ६-६ असे गुण झाले होते. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने ७-१ अशी बाजी मारली आणि पहिला सेट ७-६ असा जिंकला.
One set away.
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
On his first opportunity, @DjokerNole breaks the Federer serve to clinch the second set 6-4. #AO2020 | #AusOpenpic.twitter.com/eKCfGy2uoo
पहिला सेट जिंकल्यावर जोकोव्हिचचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळाले. दुसऱ्या सेटमध्ये हा बदल पाहायला मिळाला. दुसरा सेट जोकोव्हिचने ६-४ असा सहजपण जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही दमदार खेळ करत जोकोव्हिचने सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
🎱 points away.@DjokerNole breaks Federer to lead the Swiss 4-2 in the third set.#AO2020 | #AusOpenpic.twitter.com/61DDUyPUSL
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020