Shocking : भारताच्या धावपटूची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:24 AM2018-11-14T09:24:04+5:302018-11-14T09:24:35+5:30
आंतरराष्ट्रीय खेळाडू पलेंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय खेळाडू पलेंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. गोंडा येथील कॅमथल थाना येथील पलेंदर हा जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील अॅथलीट अकादमीत राहत होता. त्याने हॉस्टेलच्या खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
#Delhi: Parvinder Chaudhary, an 18-year-old sprinter, has allegedly committed suicide by hanging himself from a ceiling fan inside his hostel room in athletics academy at Delhi's Jawaharlal Nehru stadium.
— ANI (@ANI) November 14, 2018
''सोमवारी सकाळी वडिलांशी त्याचे फोनवर भांडण सुरू झाले होते. त्यानंतर त्याची बहीण येथे आली होती आणि तिने त्याच्याशी चर्चा केली होती. दुर्दैवाने आम्ही त्याला वाचवू शकलो नाही,''अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली.
''त्याला पैसे हवे होते. त्याला मी ते लवकरच देणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यानंतर काय घडलं याची मला कल्पना नाही. स्टेडियममधील कोणावरही माझी तक्रार नाही,'' असे पलेंदर चौधरीच्या वडिलांनी सांगितले.
He told me he needed money. I assured him that I will give him the money. Don't know what happened later. I've no complaints against the people at the stadium:Mahesh Pal, Father of sprinter Palender Chaudhary (who allegedly committed suicide at Delhi's JL Nehru stadium yesterday) pic.twitter.com/bxQmHxsv39
— ANI (@ANI) November 14, 2018
#Delhi: According to Delhi Police, the name of the 18-year-old sprinter who allegedly committed suicide at JL Nehru Stadium yesterday, is Palender Chaudhary and not Parvinder Chaudhary, as earlier told by the Sports Authority of India. https://t.co/rROGgOM0ll
— ANI (@ANI) November 14, 2018