Mason Greenwood Harriet Robson: खळबळजनक! एक्स गर्लफ्रेंडने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो; पोलिसांनी केली फुटबॉलरला अटक; नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:06 PM2022-01-31T13:06:39+5:302022-01-31T13:18:35+5:30

एक्स गर्लफ्रेंड हॅरियट रॉबसनने पोस्ट केलेले फोटो झटपट व्हायरल झाले अन्...

Shocking Photos on Instagram ex girlfriend Harriet Robson accuses footballer Mason Greenwood over domestic violence sexual assault | Mason Greenwood Harriet Robson: खळबळजनक! एक्स गर्लफ्रेंडने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो; पोलिसांनी केली फुटबॉलरला अटक; नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर

Mason Greenwood Harriet Robson: खळबळजनक! एक्स गर्लफ्रेंडने इन्स्टाग्रामवर शेअर केले फोटो; पोलिसांनी केली फुटबॉलरला अटक; नक्की काय घडलं.. वाचा सविस्तर

googlenewsNext

Mason Greenwood Harriet Robson: मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलर मेसन ग्रीनवूड मोठ्या अडचणीत सापडला आहे. ग्रीनवुडवर त्याची एक्स गर्लफ्रेंड हॅरियट रॉबसन हिने लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत. याच आरोपांवरून ग्रीनवुडला पोलिसांनी अटक केल्याची घटना रविवारी उशीर घडली. हॅरियट रॉबसनने रविवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्या फोटोंच्या मदतीने ग्रीनवूडने तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.

नक्की काय घडलं?

रविवारी हॅरियटने काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरच्या स्टोरीवर शेअर केले. त्यातील एका फोटोत तिच्या नाकातून रक्त येत होतं. तसेच इतर काही फोटोंमध्ये शरीराच्या विविध अवयवांवरील व्रण आणि मारहाणीच्या खुणांचे फोटो होते. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो समोर आल्यानंतर २० वर्षीय ग्रीनवूडवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. त्यामुळे त्याला पोलिसांनी बलात्कार व प्राणघातक हल्ला केल्याच्या कथित आरोपांच्या संशयावरून अटक केली.

हॅरियटने पोस्ट केलेले मारहाणीचे फोटो-

दरम्यान, अटकेआधी ग्रीनवूडने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मँचेस्टर युनायटेडने याबाबत निवेदन जारी केलं होतं. त्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ग्रीनवूडवर झालेल्या आरोपांबाबत क्लब व्यवस्थापनाला कल्पना आहे. आम्ही हिंसाचाराचे अजिबातच समर्थन करत नाही, असं स्पष्ट मत व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आलं. 'सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि आरोपांबाबत आम्हाला माहिती आहे. आरोपांची पडताळणी होईपर्यंत आम्ही फार काही बोलणार नाही. मँचेस्टर युनायटेड कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही', असं त्यांनी पत्रकात नमूद केलं होतं.

Web Title: Shocking Photos on Instagram ex girlfriend Harriet Robson accuses footballer Mason Greenwood over domestic violence sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.