जीएसटीमुळे नेमबाज नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:28 AM2017-08-10T01:28:05+5:302017-08-10T01:28:05+5:30
क्रीडासाहित्यावर जीएसटी लागू झाल्यामुळे नेमबाजांमध्ये तीव्र असंतोष आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरआय) यासंदर्भात अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : क्रीडासाहित्यावर जीएसटी लागू झाल्यामुळे नेमबाजांमध्ये तीव्र असंतोष आहे. राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरआय) यासंदर्भात अर्थमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. नेमबाजांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा विश्वास एनआरआयने खेळाडूंना दिला.
नेमबाजी उपकरणांवर वस्तू आणि सेवाकरांतर्गत चढ्या दराने कर आकारण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंमध्ये चिंता पसरली असून, विदेशातून मागविण्यात येणाऱ्या बंदुकांवर मोठा कर आकारण्यात येत आहे. एनआरआय अध्यक्ष रानिदरसिंग म्हणाले, ‘आम्ही अर्थ मंत्रालयाकडे ही समस्या मांडली. तोडगा निघेल, अशी आशा आहे. खेळाडूंच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ ‘पिस्तूलकिंग’ माजी नेमबाज जसपाल राणा म्हणाला, ‘क्रीडासाहित्यावर जीएसटी लावणे हा अडथळा आहे. खेळाडू फार गरीब कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांच्या खिशाला हा कर परवडणारा नाही. देशाचा गौरव उंचाविणाºया खेळाडूंची पाठ थोपटण्याऐवजी क्रीडासाहित्यावर १८ ते २८ टक्के जीएसटी लावणे अन्याय आहे. (वृत्तसंस्था)