नेमबाज हीना सिद्धूची प्रशिक्षकावर टीका
By Admin | Published: June 16, 2017 04:02 AM2017-06-16T04:02:50+5:302017-06-16T04:02:50+5:30
भारतीय अव्वल नेमबाज हीना सिद्धूने भारताचे मुख्य पिस्तुल प्रशिक्षक पॉवेल स्मिरनोव्ह यांच्यावर टीका केली. त्यांना खेळाबाबत कुठलीही तांत्रिक माहिती नसल्याचे हीनाने म्हटले आहे.
मुंबई : भारतीय अव्वल नेमबाज हीना सिद्धूने भारताचे मुख्य पिस्तुल प्रशिक्षक पॉवेल स्मिरनोव्ह यांच्यावर टीका केली. त्यांना खेळाबाबत कुठलीही तांत्रिक माहिती नसल्याचे हीनाने म्हटले आहे.
हीना म्हणाली,‘प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांना कधीच माझ्या प्रश्नांचे उत्तर देता आलेले नाही. त्यांना तांत्रिक माहिती नाही. हे केवळ माझ्याबाबतच घडलेले नसून जीतू राय यानेही मला हेच सांगितले.’
हीना पुढे म्हणाली,‘केवळ मी व जीतूलाच नाही तर जास्तीत जास्त नेमबाजांना ते तांत्रिक बाबतीत कमकुवत भासतात. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास इच्छुक नाही. मी काही दिवस त्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. कारण महासंघाने म्हटले होते की, त्यांना एक संधी द्या आणि बघा ते उपयुक्त आहेत किंवा नाही. माझ्या मते ते योग्य नाहीत.’
ही २७ वर्षीय नेमबाज तिचे प्रशिक्षक व पती रौनक पंडित यांच्यासोबत काम करते.
हीना व जीतू यांना गबालामध्ये नेमबाजी विश्वकप स्पर्धेत मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल डेमोमध्ये भारतातर्फे सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. मिश्र टीम एअर पिस्तुल स्पर्धा २०२० च्या टोकि ओ आॅलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या स्पर्धांपैकी एक आहे. (वृत्तसंस्था)