नेमबाजी

By admin | Published: June 29, 2015 12:38 AM2015-06-29T00:38:09+5:302015-06-29T00:38:09+5:30

आएसएसएफ ज्युनिअर नेमबाजी

Shooting | नेमबाजी

नेमबाजी

Next
सएसएफ ज्युनिअर नेमबाजी
भारताची शानदार सुरुवात
नवी दिल्ली : भारताच्या ज्युनिअर नेमबाजांनी जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघातर्फे (आयएसएसएफ) ज्युनिअर कप स्पर्धेत शानदार सुरुवात करताना स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली.
भारतीय पुरुष संघाने ज्युनिअर गटात २५ मीटर स्टँडर्ड पिस्तुल नेमबाजीमध्ये सांघिक व वैयक्तिक गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. या व्यतिरिक्त संघाने दोन रौप्य व दोन कांस्य पदके पटकावली. शिवम शुक्लाने ५६० गुणांची कमाई करताना सुवर्णपदकाचा मान मिळविला. रितुराज सिंगने रौप्य तर इटलीच्या दारियो दी मार्टिनोने कांस्य पदक पटकावले. सांघिक स्पर्धेत भारताच्या शिवम, रितुराज व अचल प्रताप ग्रेवाल यांनी १६७१ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत रौप्य पदक फ्रान्सच्या संघाने पटकावले तर रशियन संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय ज्युनिअर पुरुष डबल ट्रॅप संघाने कांस्यपदकाचा मान मिळवला. या संघात प्रियांशू पांडे, जैसल सिंग व अहवर रिजवी यांचा समावेश होता. वैयक्तिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱ्या प्रियांशूला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय महिला ज्युनिअर संघाने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये ११३५ गुणांची कमाई करताना रौप्यपदकाचा मान मिळवला. यश्विनी सिंग देसवाल, श्रेया गांवडे व गौरी शेरान यांचा समावेश असलेल्या संघाला थोड्या फरकाने सुवर्णपदक गमवावे लागले. या स्पर्धेत पुरुषांच्या विभागात भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले. अचल प्रताप ग्रेवाल, अर्जुन दास व अनमोल यांचा समावेश असलेल्या संघाने १७०२ चा स्कोअर केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.