नेमबाजी-बॅडमिंटन संघ मजबूत असेल
By admin | Published: December 23, 2015 11:47 PM2015-12-23T23:47:11+5:302015-12-23T23:47:11+5:30
आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून पदकाची आशा केली जात आहे.त्यासाठी बॅडमिंटन अणि नेमबाजीत मजबूत भारतीय संघ उतरवला जाईल
नवी दिल्ली : आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून पदकाची आशा केली जात आहे.त्यासाठी बॅडमिंटन अणि नेमबाजीत मजबूत भारतीय संघ उतरवला जाईल, असा विश्वास राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद आणि दिग्गज नेमबाज गगन नारंग यांनी व्यक्त केला आहे. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नारंग म्हणाला की, रिओ आॅलिम्पिकसाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला संघ असेल. भारतीय नेमबाजांमध्ये मोठी प्रतिभा आहे. युवा आणि काही अनुभवी खेळाडूंकडून मोठी आशा असेल. भारतीय संघ पाच किंवा सहाचा कोटा पूर्ण करेल, असा विश्वास वाटतो. गेल्या आॅलिम्पिकपेक्षा यावर्षीचा संघ अधिक मजबूत असेल, असेही नारंगने सांगितले.
दुसरीकडे, बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद म्हणाला की, आॅलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटन संघही मजबूत असेल. गेल्या वर्षांत या खेळात खूप सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे मोठी अपेक्षा केली जावू शकते.(वृत्तसंस्था)