वडिलांपाठोपाठ नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचेही निधन, क्रीडा क्षेत्राला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 02:29 PM2021-05-20T14:29:08+5:302021-05-20T14:30:44+5:30

मोनाली यांनी माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते.

Shooting coach Monali Gorhe no more | वडिलांपाठोपाठ नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचेही निधन, क्रीडा क्षेत्राला धक्का

वडिलांपाठोपाठ नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचेही निधन, क्रीडा क्षेत्राला धक्का

Next

नाशिक- आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (४४) (Monali Gorhe) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या मृत्यूपूर्वी काही तास आधीच पहाटेच्या सुमारास त्यांचे वडील मनोहर गोऱ्हे (७३)यांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनापाठोपाठ मुलीचेही निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Shooting coach Monali Gorhe no more)

मोनाली यांचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी मनोहर गोऱ्हे यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदिरानगरच्या जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी मनोहर  गोऱ्हे यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार होता. मात्र, त्यांच्या पाठोपाठ मोनाली यांचेही निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

मोनाली यांनी माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवल्यानंतर एक्सेल शुटींग नावाने नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. गत दशकभराहून अधिक काळापासून मोनाली या त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे कार्य करत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहिण आहे.

Web Title: Shooting coach Monali Gorhe no more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.