नेमबाजी विश्वचषक : मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांची सुवर्णपदकाला गवसणी; चीनला मागे टाकत भारत अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 06:35 PM2019-09-03T18:35:44+5:302019-09-03T18:36:41+5:30
10 मी. एअर पिस्तुल विभागातील मिश्र दुहेरी गटामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक पटकावले.
नवी दिल्ली : भारताच्या मनु भाकर आणि सौरभ चौधरी आईएसएस विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सुवर्णपदकासह भारताने या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. 10 मी. एअर पिस्तुल विभागातील मिश्र दुहेरी गटामध्ये मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सुवर्णपदक पटकावले.
10 मी. एअर पिस्तुल विभागातील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा या जोडीने रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदकाची लढत चांगलीच अटीतटीची झाली. पण या लढतीत मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 17-15 अशा विजयासह सुवर्णपदकाला गवसणी घातली.
Indian shooters dominated in Brazil, winning 4 medals in the final day of the World Cup.
— ISSF (@ISSF_Shooting) September 2, 2019
Two medals were won by athletes from the People’s Republic of China.https://t.co/Z30GF5yO5Gpic.twitter.com/q7PUWcjuLx
भारताने या स्पर्धेमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताच्या खात्यामध्ये एकूण 9 पदके आहे. या विश्वचषकात दुसरा क्रमांक पटकावला तो चीनने. या विश्वचषकात चीनने एकूण सात पदकांची कमाई केली. चीनने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके मिळवली.