‘प्रशिक्षक नियुक्तीमध्ये सरकारची भूमिका असावी’
By admin | Published: November 11, 2016 12:55 AM2016-11-11T00:55:22+5:302016-11-11T01:31:44+5:30
विविध खेळांसाठी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करताना सरकारची भूमिका महत्त्वाची असायला हवी, असे मत क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : विविध खेळांसाठी विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करताना सरकारची भूमिका महत्त्वाची असायला हवी, असे मत क्रीडामंत्री विजय गोयल यांनी व्यक्त केले. प्रशिक्षकांच्या अंतिम नियुक्तीबाबत कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित महासंघासोबत चर्चा करण्यात येईल, असेही गोयल यांनी या वेळी स्पष्ट केले.
क्रीडामंत्री गोयल यांनी नेमबाज गगन नारंग, माजी हॉकीपटू वीरेन रासकिन्हा आणि जगवीर सिंग यांच्यासह साईचे माजी महासंचालक यांच्यासोबत चार तास प्रदीर्घ चर्चा केली. २०२० च्या आॅलिम्पिकवर लक्ष केंद्रित करताना या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
गोयल म्हणाले, ‘‘आगामी आॅलिम्पिकच्या तयारीला आतापासून प्रारंभ व्हायला हवा. त्यासाठी आम्ही या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात आम्हाला अनेक सूूचना मिळाल्या. या बैठकीचा अहवाल तयार करण्यात येईल. त्यात देशात खेळासाठी उपलब्ध आधारभूत सुविधांचाही उल्लेख करण्यात येईल.’’गोयल पुढे म्हणाले, ‘‘भारतीय प्रशिक्षकांना आता ५० हजार ते २ लाख रुपये प्रदान करण्यात येईल. महासंघातर्फे विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येते, पण गरज भासली, तर आम्ही त्यासाठी जाहिरातही प्रकाशित करू. ’’