आशा पदकांच्या श्रीगणोशाची
By admin | Published: July 24, 2014 01:25 AM2014-07-24T01:25:45+5:302014-07-24T01:25:45+5:30
20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टिंगमधये मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी महिला गटात 48 किलो आणि पुरुष गटात 56 किलो प्रकारातील स्पर्धा होतील.
Next
वेटलिफ्टिंग : संजीता कुमारी व मीराबाई चानूचा विश्वास
ग्लास्गो : 20 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले पदक वेटलिफ्टिंगमधये मिळण्याची दाट शक्यता आहे. गुरुवारी महिला गटात 48 किलो आणि पुरुष गटात 56 किलो प्रकारातील स्पर्धा होतील.
या दोन्ही वजन प्रकारातभारतीय खेळाडूंकडून पदकाची आशा आहे. उद्याच्या कामगिरीवर या स्पर्धेतील पुढील कामगिरी कशी राहील हे देखील विसंबून असेल. 2क्1क् च्या स्पर्धेच्या तुलनेत आणखी सरस कामगिरी घडेल हा हे देखील उद्या निश्चित होणार आहे. 2क्1क् साली नायजेरियाने या प्रकारात पाच सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली होती. त्या खालोखाल समोआने तीन सुवर्ण तर भारताने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यांची कमाई केली होती. 2क्1क् साली खेळलेले सहा खेळाडू भारतीय संघात कायम आहेत.कामगिरीत हे सर्वजण सातत्य राखतील, अशी आशा आहे. नायजेरियाची तयारी तितकी चांगली झालेली नाही. आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंना परदेशी प्रशिक्षकाचे मार्गदश्रन मिळाले नाही शिवाय खेळाडूंनाही परदेशात खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती. तरीही या देशाने 2क्1क् मध्ये 63 किलो वजन गटात सुवर्ण जिंकणारा ओबियोमा अगाथा ओकोली याच्यासह तगडा संघ पाठविला आहे.
दुसरीकडे जोहान्सबर्ग येथे गेल्या नोव्हेंबरमध्ये संपलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत देदिपञयमान यश मिळविले.त्याबळावर भारताच्या अनेक खेळाडूंचे रँकिंग कॉमनवेल्थ खेळाडूंमध्ये पहिल्या तीनमध्ये येऊ शकले. पुरुष गटाच्या 69 किलो वजनी गटात 2क्1क् साली सुवर्ण जिंकणारा के. रवीकुमार हा यंदाही संघात आहे पण तो 77 किलो वजनी गटात खेळणार असल्याने पदकाची आशा बाळगणो योग्य होणार नाही. खुमुकचाम संजीता आणि मीराबाई चानू या उद्या 48 किलो गटात महिला प्रकारात पदक जिंकण्याच्या इराद्याने उतरतील. कुंजुराणी देवी खेळत असल्यापासून भारताने या वजन गटात नेहमी वर्चस्व गाजविले आहे. मागच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने या प्रकारात रौप्य आणि कांस्य जिंकले होते. संजीता आणि मीराबाई चानू यांना नायजेरियाची निका अमालाहा हिचे कडवे आव्हान राहील. याशिवाय कॅनडाची जेसिका रुएल, द. आफ्रिकेची पोर्टा यांचे देखील स्पर्धेत कडवे आव्हान राहील. संजीता आणि मीराबाई यांनी नागपुरात मार्च महिन्यात झालेल्या 45 व्या सिनियर नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत क्रमश: 179 आणि 161 किलो वजन उचलले होते. याशिवाय गतवर्षीच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत मीराबाईने 166 किलो वजन उचलण्याच्या कामगिरीसह सुवर्ण पदक जिंकले आहे हे विशेष. (वृत्तसंस्था)
आजच्या स्पर्धा
बॅडमिंटन
प्राथमिक फेरीदु.क्1.3क्-दु.क्5.क्क्
दु.क्6.3क्-रा.1क्.क्क्
रा.11.3क्-प.क्3.क्क्
जिम्नॅस्टिक
प्राथमिक फेरीदु.क्4.3क्-रा.क्8.क्क्
अंतिम फेरीरा.1क्.3क्-प.क्2.क्क्
हॉकी
प्राथमिक फेरीदु.क्1.3क्-रा.क्8.क्क्
रा.11.3क्-प.क्3.क्क्
जुडो
प्राथमिक फेरीदु.क्2.3क्-रा.क्8.3क्
अंतिम फेरीरा.1क्.3क्-प.क्1.15
स्कॉश
प्राथमिक फेरीदु.क्3.3क्-रा.क्7.3क्
रा.क्9.क्क्-प.12.3क्
टेबल टेनिस
उपांत्य फेरीदु.क्2.क्क्-रा.क्7.क्क्
रा.8.3क्-प.क्1.क्क्
वेटलिफ्टिंग
प्राथमिक फेरीदु.क्2.3क्-दु.क्4.3क्
अंतिम फेरीरा.क्8.क्क्-रा.1क्.क्क्
रा.12.क्क्-प.2.3क्
थेट प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्स