Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:17 PM2022-01-13T14:17:50+5:302022-01-13T14:18:53+5:30
इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.
इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडूला २० वर्षीय मालविका बनसोड ( Malvika Bansod) हिनं ३४ मिनिटांत पराभूत केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील मालविकानं हा सामना २१-१७, २१-९ असा जिंकून स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली.
🗣 “Dream come true” 😍🥺#MalvikaBansod’s post match reaction👇#YonexSunriseIndiaOpen2022#IndiaKaregaSmash#Badmintonpic.twitter.com/lkXtFhhNmZ
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022
लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनानं बुधवारी पहिल्याच सामन्या झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा स्व्हॅबिकोव्हाचा २२-२०, १-० असा पराभव केला. झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूनं दुखापतीमुळे माघार घेतली. मालविकानं पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारूकीवर २१-१८, २१-९ असा विजय मिळवला होता.
⚔️ @NSaina 🤜🤛 #MalvikaBansod
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022
#YonexSunriseIndiaOpen2022#IndiaKaregaSmash#Badmintonpic.twitter.com/9mjr3BiLLA
२००७नंतर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सायनाला दुसऱ्यांदाच भारतीय खेळाडूकडून हार मानावी लागली आहे. २०१७मध्ये तिला याच स्पर्धेत पी व्ही सिंधूनं पराभूत केले होते.
#Badminton#YonexSunriseIndiaOpen2022
Absolutely no celebration by Malvika as she becomes only the second Indian player to beat Saina on the domestic or international circuit since 2007. Sindhu had beaten Saina in the same tournament in 2017. Malvika wins 21-17, 21-9. pic.twitter.com/2yWl3HaObY— Abhijeet Kulkarni (@abk6580) January 13, 2022