युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल

By admin | Published: September 10, 2016 03:50 AM2016-09-10T03:50:24+5:302016-09-10T03:50:24+5:30

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ‘सिक्सरकिंग’ युवराजसिंग यंदा डिसेंबरमध्ये प्रेयसी हेजल किथ हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.

Shuvamangal in Yuvraj-Hejal's December | युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल

युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल

Next


नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ‘सिक्सरकिंग’ युवराजसिंग यंदा डिसेंबरमध्ये प्रेयसी हेजल किथ हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्न सोहळा डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात दुबईत होईल.
लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात येणार असून याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा युवराज म्हणाला, ‘लग्नात कुटुंबातील मंडळी तसेच मित्रांचा समावेश असेल. युवराज-हेजलचा साखरपुडा गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. हेजलची आई मूळ उत्तर प्रदेशची असल्यामुळे तेथील परंपरेचेही पूर्ण पालन केले जाणार आहे. युवीचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. त्याच्या आसपास लग्नाची तारीख असेल, असे युवराजची आई शबनमसिंग यांनी संकेत दिले.

Web Title: Shuvamangal in Yuvraj-Hejal's December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.