अरनॉल्ड क्लासिक स्पर्धेसाठी भारताकडून सिध्दांत मोरेची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 06:20 PM2019-09-19T18:20:22+5:302019-09-19T18:21:37+5:30
आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी स्पेनला होणार रवाना
मुंबई : भारताचा उदयोन्मुख शरीरसौष्ठव पटू सिध्दांत मोरेची १९ ते २२ सप्टेंबर बार्सिलोना स्पेन येथे होणाऱ्या अरनॉल्ड क्लासिक मेन्स अम्याच्यूअर बॉडीबिल्डिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वीपण सिध्दांतने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी केलेली असून खेळासोबतच अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे .
जगात अतिशय मानाची व प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे .या स्पर्धेला स्वतः अरनॉल्ड स्वगनायझर व इंटरनॅशनल फेडरेशन चे अध्यक्ष डॉ .राफेल सॅन्टोझा उपस्तिथ असतात .जगातून १५० पेक्षा अधिक देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
सिध्दांत हा मराठवाड्यातील पहिलाच खेळाडू या स्पर्धेत आपले प्रयत्न ,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर आपले नशीब आजमावणार आहे .
त्याच्याकडून पदकाची अपेक्षा असून तशी शैलीदार शरीर प्रकृती व उंचीच्या जोरावर तो स्पर्धेत सहभागी होणार आहे त्याने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करून अतिशय पिळदार शरीर बनवले आहे .
सिध्दांत मोरे याने कलासिक १८० सेमी गटामध्ये " भारत श्री " होण्याचा मान पटकावला आहे सिध्दांत ने यापूर्वी २०१५ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रजत पदक मिळवले २०१४ मध्ये श्रीलंका येथील स्पर्धेत सहावा क्रमांक प्राप्त केला होता .सिध्दांत ने राज्य राष्टीय ,आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळविली असून भारतातील सर्वात कमी वयात उत्कृष्ट कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे .चित्रपट अभिनेता व खेळाडू अशी दुहेरी भूमिका तो साकारत आहे .