शीख खेळाडूंना पगडी उतरविण्यास भाग पाडले

By admin | Published: July 24, 2014 01:21 AM2014-07-24T01:21:22+5:302014-07-24T01:21:22+5:30

एशिया कप बास्केटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात भारताच्या दोन शीख खेळाडूंना पगडी उतरविण्यास भाग पाडल्याचा प्रकार ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ने (बीएफआय) गांभीर्याने घेतला

The Sikh players were forced to wear turbans | शीख खेळाडूंना पगडी उतरविण्यास भाग पाडले

शीख खेळाडूंना पगडी उतरविण्यास भाग पाडले

Next
नवी दिल्ली : चीन येथील वुहानमध्ये झालेल्या एशिया कप बास्केटबॉल स्पर्धेतील एका सामन्यात भारताच्या दोन शीख खेळाडूंना पगडी उतरविण्यास भाग पाडल्याचा प्रकार ‘बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ने (बीएफआय) गांभीर्याने घेतला असून, आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (फिबा) विरुद्ध अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 
हा प्रकार 12 जुलै रोजी जपान विरुद्धच्या सामन्यापूर्वी घडला आहे. भारतीय संघातील अमृतपाल सिंग अणि अमज्योतसिंग या दोन शीख खेळाडूंना पगडी उतरवण्यास 
सांगण्यात आले. ‘फिबा’च्या नियमानुसार पगडी घालून खेळणो नियमाविरुद्ध असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. 
सामनाधिका:यांनी ‘फिबा’च्या नियम क्र. 4.4.2 चा हवाला दिला होता. या नियमामध्ये इतर खेळाडूंना इजा होईल अशा पद्धतीचा 
पेहराव करण्यास खेळाडूंना बंदी 
आहे. यामध्ये पुढे असे म्हटले आहे 
की, मुंडासे, केस बांधण्यासाठी उपयोगात येणारी साधने (हेअरपिन वगैरे) किंवा आभूषणो वापरण्यास परवानगी नाही. 
भारतीय संघाचे अमेरिकन कोच स्कॉट फ्लेमिंग यांनी सामनाधिका:यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 
‘बीएफआय’चे सरचिटणीस अजय सूद यांनी या प्रकाराची माहिती घेतली असून, 24 जुलै रोजी ‘फिबा’विरुद्ध अधिकृत 
तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी सांगितले. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. उद्या, गुरुवारी दोहा येथे ‘फिबा’ची आशिया विभागाची बैठक होत असून, यात आम्ही हा मुद्दा उपस्थित करून ‘फिबा’चा औपचारिक निषेध नोंदविणार आहोत, असेही सूद यांनी सांगितले.‘बीएफआय’चे वरिष्ठ उपाध्यक्ष के. गोविंदराज हे उद्याच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करतील. 
 

 

Web Title: The Sikh players were forced to wear turbans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.