वडगावच्या जयदेव म्हमाणेला रौप्यपदक
By admin | Published: October 25, 2014 10:50 PM2014-10-25T22:50:04+5:302014-10-25T22:50:04+5:30
सोलापूर :
Next
स लापूर : अनापा (रशिया) येथे झालेल्या जागतिक वाको वर्ल्ड डायमंड कप किकबॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या वडगाव (काटी) येथील जयदेव म्हमाणे याने कांस्यपदक पटकावल़े त्याने 84 किलो वजनीगटात किरगिस्तानच्या रुसलान टुपिमिकिन खेळाडूवर मात करीत अंतिम फेरी गाठली होती़ अंतिम फेरीत त्याने रशियाच्या सेरगिया पेट्रॉप या खेळाडूविरुद्ध काट्याची टक्कर दिली़ मात्र 18-15 असे गुण मिळविल्याने त्याला गुणात्मकदृष्ट्या द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागल़े जयदेव याने गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदकांची कमाई केली आह़े त्याने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत कांस्य, 2011 मध्ये इराणमध्ये सुवर्ण तर 2012 मध्ये किरगिस्तान येथे रौप्यपदक पटकावल़े आशिया खंडातून एकमेव खेळाडू म्हणून निवडलेल्या जयदेवने पिटरबर्ग, रशिया येथे 2013 साली वर्ल्ड कंबार्ड गेममध्ये संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला होता़ (क्रीडा प्रतिनिधी)000000000000000000अनापा (रशिया) येथे झालेल्या जागतिक वाको वर्ल्ड किकबॉक्सिंग डायमंड कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या वडगाव (काटी) येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू जयदेव म्हमाणे याने 84 किलो वजनीगटात रौप्यपदक पटकावल़े त्यावेळी विजेत्या खेळाडूसोबत (उजवीकडे) जय म्हमाण़े