2007 टी-20 वर्ल्डकप आणि चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील अनेक गोष्टींमध्ये साम्य
By Admin | Published: June 17, 2017 10:59 AM2017-06-17T10:59:48+5:302017-06-17T11:02:04+5:30
रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - रविवारी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. मात्र 10 वर्षानंतर होत असलेल्या या सामन्याकडे पाहिलं तर अनेक घटनांमध्ये साम्य असल्याचं दिसत आहे. यामध्ये फक्त एकच मोठा फरक आहे तो म्हणजे, तो टी-20 वर्ल्डकप होता आणि ही चॅम्पिअन्स ट्रॉफी आहे.
दक्षिण अफ्रिकेत पार पडलेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ लीगमधील पहिल्याच सामन्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे चॅम्पिअन्स ट्रॉफीकडे पाहिलं तर नेमका अशाच प्रकारचा घटनाक्रम असल्याचं दिसत आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 वर्ल्डकप आपल्या नावे केला आणि भारतीयांची मान उंचावली.
यावेळी आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतही दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकमेकांविरोधातच खेळला. विशेष म्हणजे या सामन्यातही भारताचाच विजय झाला. यानंतर दोन्ही संघांनी इतर संघांवर मात करत अंतिम फेरी गाठली. यावेळी अंतिम सामन्यात कोण बाजी मारतं हे रविवारी पाहायला मिळेल.
तसंच यावेळी बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये काही गोष्टींवरुन वाद सुरु आहे, तशीच परिस्थिती 2007 मध्ये होती. यावेळी भारत चॅम्पिअन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होता. त्यावेळीही बीसीसीआय वर्ल्ड टी-20 स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी भारताने खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोर्डाच्या महसूलावरुन 9-1 मतं मिळाल्यानंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचं ठरलं होतं. मात्र यावेळी भारताने ऐनवेळी सहभागी होण्याच निर्णय घेतला.
2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या इरफान पठाणने भारतीय संघ 10 वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.