महाराष्ट्राचा सहज विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2016 03:11 AM2016-01-08T03:11:42+5:302016-01-08T03:11:42+5:30

निखिल नाईकचे तडाखेबंद अर्धशतक, प्रयाग भाटी, अंकित बावणे यांची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बलाढ्य कर्नाटकवर २६ धावांनी विजय मिळवला.

Simple victory of Maharashtra | महाराष्ट्राचा सहज विजय

महाराष्ट्राचा सहज विजय

googlenewsNext

कटक : निखिल नाईकचे तडाखेबंद अर्धशतक, प्रयाग भाटी, अंकित बावणे यांची स्फोटक खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने बलाढ्य कर्नाटकवर २६ धावांनी विजय मिळवला.
बलाढ्य कर्नाटक संघाविरुद्ध महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ८ बाद १८४ धावा चोपल्या. महाराष्ट्राकडून युवा फलंदाज निखिल नाईकने अवघ्या ४५ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांसह सर्वाधिक ६७ धावा केल्या. प्रयाग भाटी याने ३२ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३९, तर अंकित बावणे याने अवघ्या २0 चेंडूंतच ३ चौकार व २ षटकारांसह ३३ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पाच्या ५२ चेंडूंतील १0 चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ८0 धावांच्या खेळीनंतरही कर्नाटकला महाराष्ट्राने १८.३ षटकांत १५८ धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळवला.

Web Title: Simple victory of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.