सिंधूचे आता ‘सुवर्ण’लक्ष्य!
By admin | Published: August 19, 2016 06:38 AM2016-08-19T06:38:45+5:302016-08-19T06:38:45+5:30
जपानच्या ओकुहारा नोझोमीवर सुरुवातीपासून आक्रमक हल्ला करत रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात विजय मिळविलेल्या सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे.
रिओ : जपानच्या ओकुहारा नोझोमीवर सुरुवातीपासून आक्रमक हल्ला करत रिओ आॅलिम्पिकच्या उपांत्य सामन्यात विजय मिळविलेल्या सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे. तिचा आत्मविश्वास पाहता आता अंतिम लढतीत सुवर्ण‘स्मॅश’ची तमाम भारतीयांना अपेक्षा आहे. अंतिम लढत स्पेनच्या कॅरोलिनशी होईल.
लक्षवेधी...
पहिल्या गेममध्ये कडवी लढत मिळाल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्ये मोठी आघाडी घेत सलग गुणांची वसुली करून निझोमीला दबावाखाली आणले.
दबावाखाली आलेल्या निझोमीला चुका करण्यास भाग पाडून सिंधूने बाजी मारली.
सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक होत जपानच्या नोझोमीवर ताकदवान स्मॅशचा वर्षाव केला.
सिंधूच्या आक्रमक व ताकदवर फटक्यांपुढे नोझोमी तब्बल ४ वेळा कोर्टवर पडली.
12 दिवस भारतीय खेळाडुंची होणारी टिंगल मागे पडून सिंधु आणि साक्षी या दोघी भारताच्या क्रीडा क्षितिजावर नव्या ‘आयकॉन्स’ म्हणून उदयास आल्या.
आता लक्ष्य फक्त सुवर्णपदकाचेच असेल. याच लयीत खेळेन. साक्षीच्या यशाने उत्साह वाढला. आता मी देशाला पहिले सुवर्ण मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. हा विजय मी गोपीचंद आणि तमाम भारतीयांना अर्पण करते.- पी. व्ही. सिंधू
अंतिम सामना : आज सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी