जपान ओपनमधून सिंधूची माघार

By Admin | Published: September 15, 2016 11:30 PM2016-09-15T23:30:09+5:302016-09-15T23:30:09+5:30

रिओ आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने पुढील आठवड्यात प्रारंभ होत असलेल्या जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

Sindhu retreat from Japan Open | जपान ओपनमधून सिंधूची माघार

जपान ओपनमधून सिंधूची माघार

googlenewsNext

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने पुढील आठवड्यात प्रारंभ होत असलेल्या जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने भारताला पदक पटकावून देणाऱ्या स्टार बॅडमिंटनपटूने त्याचसोबत २७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज स्पर्धेतूनही नाव वापस घेतले आहे. त्यानंतर पुढील महिन्यात १८ आॅक्टोबरपासून ओडेंसेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डेन्मार्क ओपन सुपर सिरिजमध्ये तिच्या पुनरागमनाची आशा आहे.
२१ वर्षीय सिंधू जर जपान ओपन स्पर्धेत सहभागी झाली असती तर रिओतील सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनविरुद्ध तिची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याची शक्यता होती.
राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले,‘सिंधू टोकि योमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार नाही. डेन्मार्क ओपन स्पर्धेत ती पुनरागमन करेल. ती पुढील महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेतही सहभागी होणार नाही. आम्ही तिच्या कार्यक्रमामध्ये काही बदल केलेले आहेत.’
गेल्या वर्षी सिंधूने डेन्मार्क ओपन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी तिला चीनच्या ली जुईरुईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. सिंधूने विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळवला आहे तर ग्रांप्रीमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र तिला अद्याप सुपर सिरिजमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. रिओमधील यशानंतर तिने सुपर सिरिज स्पर्धेत चमकदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे.
आॅक्टोबर महिन्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेली सिंधू चायना ओपन व हाँगकाँग ओपन स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर डिसेंबर महिन्यात दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सुपर सिरिज फायनलसाठी ती पात्र ठरेल. यापूर्वी केवळ सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत खेळले आहेत.
सिंधूचे प्रशिक्षक म्हणाले,‘रिओ आॅलिम्पिकनंतर सिंधूकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडू तिला पराभूत करण्यासाठी तयारी करीत आहेत.’
सिंधूच्या अनुपस्थितीत श्रीकांत भारताचे आव्हान सांभाळणार आहे. पुरुष एकेरीमध्ये सहभागी होणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये अजय जयराम, बी. साई प्रणीत आणि एच.एस. प्रणय यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu retreat from Japan Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.