सिंधू, श्रीकांत यांचे विजयी अभियान सुरू

By admin | Published: January 26, 2017 01:11 AM2017-01-26T01:11:31+5:302017-01-26T01:11:31+5:30

रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने अनुरा प्रभुदेसाई आणि गतविजेत्या किदाम्बी श्रीकांतने लखानी सारंगचा अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत पराभव करीत

Sindhu, Shrikant's victory campaign started | सिंधू, श्रीकांत यांचे विजयी अभियान सुरू

सिंधू, श्रीकांत यांचे विजयी अभियान सुरू

Next

लखनौ : रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने अनुरा प्रभुदेसाई आणि गतविजेत्या किदाम्बी श्रीकांतने लखानी सारंगचा अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत पराभव करीत १२० हजार डॉलर रकमेच्या सय्यद मोदी ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सिंधूने आपल्याच देशाच्या प्रभूदेसाईला सरळ दोन सेटमध्ये २१-९, २१-११ असे पराभूत केले.
तिसऱ्या मानांकित श्रीकांतने गुडघ्यातील दुखापतीनंतर पुनरागमन केले. त्याने पहिल्याच सामन्यात लखानीचा २५-२१, २१-७ आणि २१-१४ ने पराभव केला. आता त्याचा सामना मलेशियाच्या जुल्हेल्मी जुल्कीफ्ली याच्याविरुद्ध होईल. जुल्हेल्मीने सचिन रावतचा पराभव केला आहे. २०१६ चा स्विस ओपनचा विजेता असलेल्या प्रणयने एनवीएस विजेत्याचा २१-११, २१-९ ने पराभव केला. नवव्या मानांकित प्रणिथने आदित्य जोशीला २१-१४, २१-९ ने पराभूत केले.
चिनी ताईपेचा चॅम्पियन ११व्या मानांकित सौरभने राहुल यादव चित्ताबोईनाचा २१-११, २१-१७ ने पराभव केला. जगातील १५वा मानांकित डेन्मार्कचा हंस क्रिस्टियन विटिंगघसने भारताच्या मुनावर मोहम्मदचा २१-११, २१-१३ ने पराभव केला. महिला गटात, पॉलिश ओपनची विजेती रितुपर्णा दासने नेपाळच्या नांगसाल तमांगचा २१-५, २१-६ ने पराभव केला.(वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu, Shrikant's victory campaign started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.