लसिथ मलिंगावर सहा महिन्यांची बंदी
By admin | Published: June 29, 2017 12:46 AM2017-06-29T00:46:11+5:302017-06-29T00:46:11+5:30
श्रीलंकेचा तेजतर्रार गोलंदाज लसिथ मलिंगा याला वादग्रस्त मत व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे, त्यामुळे श्रीलंका
कोलंबो : श्रीलंकेचा तेजतर्रार गोलंदाज लसिथ मलिंगा याला वादग्रस्त मत व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे, त्यामुळे श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्याच्यावर ६ महिन्यांची बंदी लादली आहे. ही बंदी करारासंबंधी उल्लंघन केल्याविषयी आहे. बंदीबरोबरच त्याला पुढील एकदिवसीय सामन्याच्या शुल्कातून ५0 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे. तथापि, या निर्णयाचा परिणाम सध्या झिम्बाब्वेत सुरू असलेल्या मालिकेवर पडणार नाही.
श्रीलंकेचे क्रीडामंत्री दयासिरी जयशेखरा यांच्याविरुद्ध व्यक्त केलेल्या वादग्रस्त मताविरुद्ध मलिंगावर ही कारवाई करण्यात आली. हा निर्णय तीन सदस्यीय समितीने घेतला असून यात एसएलसी सचिव मोहन डिसिल्वा व सीईओ अॅश्ले डिसिल्वा यांचा समावेश आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या दोन वनडेसाठी त्याचा १३ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मलिंगाने १९ जून व नंतर २१ जून असे दोनदा कराराच्या नियमांचे उल्लंघन केले होते. (वृत्तसंस्था)