षटकारांचा बादशाह ख्रिस गेल

By Admin | Published: December 20, 2015 11:49 PM2015-12-20T23:49:36+5:302015-12-21T09:29:53+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६०० षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे.

Sixth wicketkeeper Chris Gayle | षटकारांचा बादशाह ख्रिस गेल

षटकारांचा बादशाह ख्रिस गेल

googlenewsNext

ब्रिस्बेन : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६०० षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
सध्या गेल आॅस्टे्रलियामध्ये बिग बैश टी-२० स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. ब्रिस्बेन हिट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने १६ चेंडूंत २३ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. यामध्ये त्याने २ षटकारही खेचले. यासह गेलने आपल्या टी-२० कारकिर्दीमध्ये ६०० षटकार ठोकण्याचा पराक्रम केला.
एकूणच क्रिकेटमध्ये षटकारांच्या बाबतीत गेलचा दबदबा किती आहे, ते आकडेवारीवरूनच स्पष्ट होते. सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचाच किएरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने आपल्या टी-२० मध्ये ३८८ षटकार खेचले असून, तृतीय स्थानावरील न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलमने २९० षटकार ठोकले आहेत. यावरूनच गेलच्या वादळी खेळाची कल्पना येते. त्याचवेळी चौकारांच्या बाबतीतही गेलने आपली छाप पाडली असून, तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. आॅस्टे्रलियाच्या ब्रॅड हॉजने सर्वाधिक ६६४ चौकार मारले असून, गेलने ६५३ चौकार खेचले आहेत. त्याचप्रमाणे टी-२० मध्ये गेलच्या नावावर सर्वाधिक ८, ३६३ धावांचा विक्रम असून, सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. २०१३ च्या आयपीएल सत्रात गेलने बंगळुरू रॉयल्स चँलेंजर्स संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्सविरुद्ध अवघ्या ३०
चेंडंूत शतकी तडाखा दिला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Sixth wicketkeeper Chris Gayle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.