स्मिता काटवे यांनी केला सलग १२ तास पोहण्याचा पराक्रम

By admin | Published: August 16, 2014 11:08 PM2014-08-16T23:08:05+5:302014-08-16T23:08:05+5:30

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली नोंद

Smita Katway has the power to swim for 12 consecutive hours | स्मिता काटवे यांनी केला सलग १२ तास पोहण्याचा पराक्रम

स्मिता काटवे यांनी केला सलग १२ तास पोहण्याचा पराक्रम

Next
डिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली नोंद
औरंगाबाद : अदम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, वज्रनिर्धार आणि चिकाटी या जोरावर औरंगाबाद येथील सिनियर जलतरणपटू स्मिता काटवे यांनी तब्बल १२ तासांत २२.३ किलोमीटर जलतरण करण्याचा भीमपराक्रम केला. या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा राष्ट्रीय पातळीवरील हा नवीन विक्रम ठरला.
१५ ऑगस्ट रोजी स्मिता काटवे यांनी सकाळी ७ वाजेपासून पोहण्यास सुरुवात केली आणि सायंकाळी ७ वाजता त्यांनी तब्बल १२ तास न थकता जलतरण केले. विशेष म्हणजे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्नुसार अशा प्रदीर्घ कालावधीत पोहताना प्रत्येक तासाला ५ मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक होते; परंतु स्मिता काटवे यांनी पूर्ण १२ तासांत फक्त एकदाच ब्रेक घेतला. तोही सलग ५ किलोमीटर पोहल्यानंतर. या ब्रेकमध्ये डॉ. नम्रता नथानी यांनी स्मिता काटवे यांचे पल्स, बीपी, हार्टस् साऊंडस आणि फुफ्फुसाचे स्फंदन चेक केले. पूर्ण १२ तासांत त्यांनी ब्रेकच्या वेळी मोसंबी ज्यूस, एनर्जी ड्रिंक व चॉकलेट घेतले. त्यांनी जेव्हा पूर्ण १२ तास पोहल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडात त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. स्मिता काटवे यांना प्रोत्साहन मिळावे व उत्साह कायम राहावा यासाठी त्यांच्या बाजूने संघटनेतर्फे विष्णू लोखंडे यांनी साडेतीन तास आणि राष्ट्रीय खेळाडू याज्ञी गौतम, मोहंमद कदीर खान, रुस्तुम तुपे, उमा सबनीस यांनी जलतरण केले. या प्रसंगी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे महाराष्ट्र, गोवा व कनार्टकचे प्रमुख रेखा सिंह व प्रतिनिधी नागेंद्रसिंग उपस्थित होते. स्मिता काटवे यांनी याआधी ९ तास ५५ मिनिटे धरमतल ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ कि. म. अंतर पूर्ण केले होते. तसेच संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी ५ कि. मी.चे अंतर त्यांनी ११ मि. ३८ सेकंदात पूर्ण केले होते. १९९२ साली त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकही जिंकले होते. भोपाळ येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्यांनी वॉटरपोलोत रौप्यपदक मिळवले होते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कॅनडा व इटलीत होणार्‍या जलतरण स्पर्धेसाठीही त्यांची निवड झाली आहे.

Web Title: Smita Katway has the power to swim for 12 consecutive hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.