स्मिथ - मॅक्सवेलची शानदार खेळी, दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 299 धावा
By admin | Published: March 16, 2017 05:15 PM2017-03-16T17:15:20+5:302017-03-16T17:36:27+5:30
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर चार बाद 299 धावा केल्या आहेत. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह
Next
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर चार बाद 299 धावा केल्या आहेत. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजी करत 244 चेंडूत 13 चौकांरासह नाबाद 117 धावा केल्या.
सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली होती. मात्र, त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलने संघाला सावरत शानदार खेळी केली.त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर चार बाद 299 धावा केल्या. फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 82 धावा केल्या आहेत. तसेच, या सामन्यात रेनशॉ याने 69 चेंडूत 44 धावा केल्या. भारताच्या गोलंदाज उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेनशॉ ने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. तर, रेनशॉ पाठोपाठ शॉन मार्शही स्वस्तात माघारी परतला. शॉन मार्शला अवघ्या 2 धावांवर आर. अश्विनने चेतेश्वर पूजाराकरवी झेलबाद केले. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. डेव्हिड वॉर्नर याने 19 धावा केल्या. तसेच, हॅंड्सकॉम्ब हा सुद्धा मैदानावर जास्तवेळ राहू शकला नाही. त्याला 19 धावांवर गोलंजदाज उमेश यादवने पायचित करुन तंबूत पाठविले. स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल धावपट्टीवर खेळत आहेत.
दरम्यान, या कसोटीसामन्यात भारताकडून गोलंदाज उमेश यादवने दोन बळी घेतले. तर आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक बळी टिपला.
या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली जखमी झाला. पहिल्या डावातील 40 व्या षटकात रविंद्र जडेजाच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हॅंड्सकॉम्बने मारलेला शॉट सीमारेषेकडे जात असताना कोहलीने तो बॉल अडवण्यासाठी झेप घेतली. त्यावेळी तो जखमी झाला.