स्मिथची खेळी निर्णायक ठरू शकते

By admin | Published: March 17, 2017 12:32 AM2017-03-17T00:32:10+5:302017-03-17T00:32:10+5:30

यापूर्वीच्या लढतींच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असल्याचे स्टीव्हन स्मिथच्या देहबोलीवरून भासत होते. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत असून

Smith's knock can be a decisive factor | स्मिथची खेळी निर्णायक ठरू शकते

स्मिथची खेळी निर्णायक ठरू शकते

Next

हर्षा भोगले लिहितो..
यापूर्वीच्या लढतींच्या तुलनेत ही खेळपट्टी वेगळी असल्याचे स्टीव्हन स्मिथच्या देहबोलीवरून भासत होते. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळत असून, चेंडूही अपेक्षेपेक्षा अधिक वळत नसल्याचे दिसून येत आहे. भारताने पहिल्या सत्रात
वर्चस्व गाजवले; पण त्यात खेळपट्टीचा काही वाटा नव्हता. डेव्हिड वॉर्नर तर फुलटॉसवर बाद झाला. त्यामुळे त्यात खेळपट्टीची चूक आहे, असे म्हणताच येणार नाही.
विदेशी कर्णधाराने जबाबदारी स्वीकारून फलंदाजी केली, हे अलीकडच्या कालावधीत प्रथमच घडलेले नाही. त्यामुळे कर्णधारामध्ये ही विशेष प्रतिभा असते, हे अधोरेखित होते. स्मिथ आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत ही जबाबदारी चोखपणे बजावत आहे. पुणे येथील खेळपट्टीच्या तुलनेत या खेळपट्टीवर शतक झळकावताना त्याला
विशेष बदल करावा लागला नाही; पण ही खेळी मात्र निर्णायक ठरू शकते. स्मिथ वगळता आॅस्ट्रेलिया संघाची आज कल्पनाच करता आली नसती.
या मालिकेत स्मिथने पहिल्या दिवसापासून कर्णधाराला साजेशी कामगिरी केली आहे. ग्लेन मॅक्सवेल हा वेगळ्या शैलीचा खेळाडू आहे. त्याने आपल्या नैसर्गिक शैलीला मुरड घालून आज फलंदाजी केली. अशा खेळाडूला संधी मिळाली, तर तो सामन्याचे चित्र बदलू शकतो. रांचीमध्ये त्याला तशी संधी आहे.
नाणेफेकीचा कौल मिळविल्यानंतर चांगल्या संघाकडून अशा कामगिरीची अपेक्षा असते. चांगल्या सुरुवातीनंतर आॅस्ट्रेलियाला या कसोटीत वर्चस्व गाजविण्याची संधी आहे. आता भारताची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय फलंदाजांना येथे मोठी खेळी करावी लागेल; पण त्यापूर्वी आॅस्ट्रेलियाचा डाव लवकर गुंडाळणे आवश्यक आहे.
(पीएमजी)

Web Title: Smith's knock can be a decisive factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.