११ वर्षांआधी धोनीचा श्रीगणेशा

By Admin | Published: December 23, 2015 11:43 PM2015-12-23T23:43:59+5:302015-12-23T23:43:59+5:30

आपल्या जबरदस्त नेतृत्वकौशल्याच्या बळावर भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने

Smriti | ११ वर्षांआधी धोनीचा श्रीगणेशा

११ वर्षांआधी धोनीचा श्रीगणेशा

googlenewsNext

नवी दिल्ली : आपल्या जबरदस्त नेतृत्वकौशल्याच्या बळावर भारताला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ११ वर्षांआधी आजच २३ डिसेंबरला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरुवात केली होती.
२३ डिसेंबर २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या धोनीने आपल्या आतापर्यंतच्या जादुई कारकिर्दीत जगभरातील संघाविरुद्ध यश मिळवून देताना भारताला दोनदा वर्ल्डकप जिंकून दिला. त्याने २००७ मध्ये पहिल्या टष्ट्वेंटी-२० वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करताना भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर त्याने त्याच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा भारताला जिंकून देण्याचा बहुमान मिळवला. हे भारताचे वनडेतील दुसरे विश्वविजेतेपद होते. याआधी भारताने अष्टपैलू कपिलदेवच्या नेतृत्वाखाली १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती.
३४ वर्षीय धोनीने त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीचेदेखील विजेतेपद मिळवून दिले. तसेच त्याच्या नेतृत्वाखालील भारताचा कसोटी संघही जगातील नंबर वनचा संघ बनला होता. दडपणाच्या परिस्थितीतही अतिशय शांत राहण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या धोनीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण अपेक्षेनुरूप नव्हते आणि तो भोपळाही न फोडता तंबूत परतला होता. धोनीने नंतर यशाच्या पायऱ्या चढत टीम इंडियाला क्रिकेटच्या सर्वच स्वरूपात जगातील तुल्यबळ संघ बनवला. (वृत्तसंस्था)

Web Title: Smriti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.