...त्यामुळे रंगत कमी होणार नाही - हरेंद्र
By admin | Published: November 16, 2016 12:02 AM2016-11-16T00:02:37+5:302016-11-16T00:02:37+5:30
एफआयएच ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत जरी पाकिस्तान हॉकी संघाला सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही तरी या स्पर्धेची रंगत कमी होणार नाही,
बेंगळुरू : एफआयएच ज्युनिअर हॉकी विश्वकप स्पर्धेत जरी पाकिस्तान हॉकी संघाला सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही तरी या स्पर्धेची रंगत कमी होणार नाही, असे मत भारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी व्यक्त केले.
हरेंद्र म्हणाले, ‘पाकने आपल्या संघाला सहभागी होण्याची परवानगी दिली नाही तर स्पर्धेची रंगत कमी होणार नाही. विश्वकप स्पर्धा रंगत निर्माण करणारी असते. ज्यावेळी मी खेळत होतो त्यावेळीही भारत-पाक लढतीकडे कधी परंपरागत प्रतिस्पर्धी म्हणून बघितले नाही. अन्य आंतरराष्ट्रीय लढतीप्रमाणेच या लढतीला महत्त्व दिले.’
हरेंद्र पुढे म्हणाले, ‘मी खेळाडूंना सल्ला देतो की, भारत-पाक लढतीचे दडपण न बाळगता अन्य लढतींसारखीच एक लढत असल्याप्रमाणे महत्त्व द्यावे.’
सीमेवरील तणाव लक्षात घेता पाकिस्तान हॉकी महासंघाला विश्वकप स्पर्धेत राष्ट्रीय संघ पाठविण्यासाठी अद्याप एनओसी मिळालेली नाही.
विश्वकप स्पर्धेसाठी खेळाडू उत्सुक असल्याचे हरेंद्र म्हणाले. ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात ८ डिसेंबरला कॅनडाविरुद्धच्या लढतीपासून करणार आहे.