...अब तक ४०!
By admin | Published: February 15, 2016 03:27 AM2016-02-15T03:27:05+5:302016-02-15T03:27:05+5:30
सानिया मिर्झासाठी मार्टिना हिंगीस इतकी ‘लकी’ ठरेल असा विचार खुद्द सानियानेही केला नसेल. तब्बल ४० सलग विजयांची नोंद करून या जोडीने टेनिस क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.
सेंट पीटर्सबर्ग : सानिया मिर्झासाठी मार्टिना हिंगीस इतकी ‘लकी’ ठरेल असा विचार खुद्द सानियानेही केला नसेल. तब्बल ४० सलग विजयांची नोंद करून या जोडीने टेनिस क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. सेंट पीटस्र्बिर्ग येथे झालेल्या ५३ लाख डॉलर्स बक्षिसाचीलेडिज चषक स्पर्धा जिंकून या जोडीने कमाल केली. सानिया-हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने रशियाच्या वेरा दुशेविना आणि चेक गणराज्यच्या बार्बाेरा क्रेजिकोवा या जोडीचा अवघ्या ५६ मिनिटांत फडशा पाडला. ६-३ आणि ६-१ अशाा सरळ सेटमध्ये त्यांनी हा विजय मिळवला. सानिया-हिंगीस या जोडीने या वर्षी ब्रिस्बेन, सिडनी आणि आॅस्ट्रेलियन ओपननंतर सेंट पीटर्सबर्गचा किताब पटकाविला आहे. गेल्या वर्षी युएस ओपन जिंकल्यानंतर या जोडीने अपराजित कामगिरी केली आहे.
सानिया-हिंगीस या जोडीने सहा संधींतून चार वेळा प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदली. तर प्रतिस्पर्ध्यांना चार संधी मिळूनही एकदाही लाभ उठवता आला नाही. या विजयानंतर अव्वल मानांकित जोडीने ४७० मानांकन गुणांची कमाई केली आहे. दरम्यान, १९९० मध्ये याना नोवोत्ना आणि हेलेना सुकोवा या जोडीने सलग ४४ सामने जिंकले होते. टेनिस इतिहासात सर्वाधिक दुहेरीतील १०९ सामने जिंकण्याचा विक्रम मार्टिना नवरातिलोव्हा आणि पाम
श्राइवर यांच्या नावे आहे. सानिया-हिंगीस या जोडीची याच दिशेने आगेकूच सुरू आहे. (वृत्तसंस्था)