CoronaVirus: ...तर लग्नात मुलीचा बाप होणार नाही कर्जबाजारी; बबिता फोगटनं दिलेली आयडिया लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:01 PM2020-05-02T18:01:01+5:302020-05-02T18:04:32+5:30
17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन दोन वेळा वाढवण्यात आला. 17 मे पर्यंत आता हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांची लग्न कार्य रखडली आहेत. पण, काहींनी 5-10 माणसांमध्ये आपापला विवाह सोहळा पार पाडला. कोरोना व्हायरसमुळे लोकांना मोजक्याच नातेवाईकांमध्ये लग्न करावं लागत आहे. असे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राष्ट्रकुल पदकविजेती कुस्तीपटू आणि भाजपा नेता बबिता फोगाट हीनं कोरोना व्हायरसमुळे एक नवी परंपरा सुरू झाल्याचे सांगितले आहे.
Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका
Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...
तिनं ट्विट केलं की,'' सध्या 5-10 लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य केलं जात आहे. हीच परंपरा कोरोना व्हायरस संपुष्टात आल्यानंतर कायम राहिल्यास मुलीच्या बापावर कर्जबाजारी होण्याची वेळ येणार नाही. माझी देशवासियांना हात जोडून विनंती आहे की, त्यांनी ही परंपरा कायम राखावी. यामुळे देश सामाजिक आणि आर्थिक रुपाने मजबूत बनेल.''
आजकल 5-10 बराती लेकर शादियां हो रही हैं, अगर यह रिवाज करोना खत्म हो जाने के बाद भी बना रह जाए तो बेटियों के पिता कर्जदार होने से बच जाएंगे।मेरी देशवासियों से हाथ जोड़ कर अपील है इस रिवाज को बनाए रखें।इस देश की बेटियों की दुआ लगेगी और देश सामाजिक और आर्थिक रूप से मजबूत बनेगा।
— Babita Phogat (@BabitaPhogat) May 2, 2020
बबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
'या' क्रिकेटपटूच्या घरी हलला पाळणा; सोशल मीडियावरून दिली गोड बातमी
Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार
Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव
न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम
विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा
टीम इंडियानं 42 महिन्यांनी गमावलं अव्वल स्थान; सर्वाधिक काळ टॉपवर राहणारा सातवा संघ!
Tamannaah Bhatia अन् पाकिस्तानी क्रिकेटपटू यांच्या लग्नाच्या रंगलेल्या चर्चा, पण...