...त्यामुळे खेळाडू परिपक्व होतो : स्टुअर्ट बिन्नी
By admin | Published: September 22, 2015 11:58 PM2015-09-22T23:58:23+5:302015-09-22T23:58:23+5:30
स्टुअर्ट बिन्नीने वयाची तिशी ओलांडली असली, तरी त्याला मोजक्याच सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली
बंगळुरू : स्टुअर्ट बिन्नीने वयाची तिशी ओलांडली असली, तरी त्याला मोजक्याच सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. कुठल्याही खेळाडूला उच्च पातळीवर आपली क्षमता सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळायला पाहिजे, असे वक्तव्य करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीच्या मताशी आपण सहमत असल्याचे अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी म्हणाला.
खेळामध्ये विशेष बदल केला नसला, तरी मानसिक दडपण झुगारण्यासाठी काही बदल निश्चितच केले, असेही बिन्नीने या वेळी स्पष्ट केले. आपल्या छोट्या कारकिर्दीत ५ कसोटी, १३ वन-डे आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा बिन्नी म्हणाला, क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमध्ये मजबूत असलेल्या संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. ही मालिका चुरशीची होईल. मालिकेत चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे.’’
नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास प्राधान्य राहील. काही षटके जुना झालेल्या आणि खूप जुना झालेल्या चेंडूने गोलंदाजी करण्यातही आनंद मिळतो. त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता येते, असेही त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि संघ संचालक रवी शास्त्री यांची तुझ्याकडून काय अपेक्षा आहे, याबाबत बिन्नी म्हणाला, ‘‘माझ्याकडून संघाला अष्टपैलू कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीबाबत मला कल्पना आहे. यात बदल अपेक्षित असतो. गोलंदाजी केव्हा करतो, सुरुवातीला की अखेरच्या टप्प्यात, यावर ही भूमिका ठरलेली असते.’’ (वृत्तसंस्था)