...त्यामुळे खेळाडू चायनामन गोलंदाजीकडे वळतील : कुलदीप
By admin | Published: April 4, 2015 04:08 AM2015-04-04T04:08:13+5:302015-04-04T04:08:13+5:30
भारत आणि विश्वक्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाजांची संख्या मोजकीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने मात्र
नवी दिल्ली : भारत आणि विश्वक्रिकेटमध्ये चायनामन गोलंदाजांची संख्या मोजकीच आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने मात्र माजी कामगिरी बघितल्यानंतर खेळाडूंना ही कला आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. चायनामन गोलंदाजी करणे सोपे नाही, असेही कुलदीप म्हणाला.
मनगटाच्या साह्याने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू चायनामन म्हणून ओळखल्या जातो. याबाबत चर्चा करताना दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स व आॅस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग हे खेळाडू डोळ्यांपुढे येतात. सुरुवातीला मध्यमगती गोलंदाज असलेला कुलदीप कानपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी जोर दिल्यामुळे फिरकीकडे वळला.
कुलदीप म्हणाला, ‘‘चायनामन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मोजकेच खेळाडू करतात. मला बघितल्यानंतर खेळाडू याकडे आकर्षित होतील, अशी आशा आहे. ही कला कठीण असल्याचे अनेकांचे मत आहे; पण मेहनत घेतली तर त्यात यश मिळवता येते. भविष्यात जागतिक क्रिकेटमध्ये अनेक चायनामन गोलंदाज दिसतील.’’