...तर सेहवागचं तोंड होणार बंद
By admin | Published: June 30, 2017 11:13 AM2017-06-30T11:13:02+5:302017-06-30T11:13:02+5:30
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी..
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सध्या वेगवेगळया नावांची चर्चा असून, रवी शास्त्रींच्या बरोबरीने विरेंद्र सेहवागचे नावही या शर्यतीत आघाडीवर आहे. प्रशिक्षकपदासाठी सेहवागने फक्त दोन ओळींचा अर्ज केल्याचे वृत्त काही प्रसिद्धीमाध्यमांनी दिल्याने सेहवाग चर्चेत आला होता. मीडियामध्ये प्रसिध्द झालेली दोन ओळींच्या अर्जाची बातमी खोडून काढताना सेहवागने आपण भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार अर्ज केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
जर मला दोन ओळींचा अर्ज पाठवायचा असेल तर, त्यासाठी माझे नावच पुरेसे आहे असे सेहवागने म्हटले आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर सेहवागची सोशल मीडियाच्या पीचवर जोरदार बॅटिंग सुरु असेत. त्याचे प्रत्येक टि्वट बातमीचा विषय बनतो. त्यामुळे उद्या जर सेहवागची प्रशिक्षकपदी निवड झालीच तर, त्याला तोंड बंद ठेवायला सांगितले जाईल असे डेक्कन क्रॉनिकलने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
आणखी वाचा
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश, लालचंद राजपूत, वेंकटेश प्रसाद यांनी अर्ज केले आहेत. रवी शास्त्री यांनी अजून अर्ज केला नसला तरी, अर्ज करण्यासाठी सचिन तेंडुलकरने त्यांचे मन वळवले आहे. त्यामुळे शास्त्रींनी अर्ज केल्यास पहिली पसंती तेच असतील. कारण कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सचिन तेंडुलकरचा त्यांच्या नावाला पाठिंबा आहे.
बीसीसीआय विचारेल तेव्हाच मी मत मांडेन : कोहली
नव्या प्रशिक्षकाच्या निवडीबाबत बीसीसीआयने मत विचारले, तरच मी याबाबत माझे मत देईल, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले.
सचिनच्या मध्यस्थीनंतर शास्त्री कोचपदासाठी अर्ज करण्यास तयार
सचिनने रवी शास्त्रीशी चर्चा केल्यानंतर रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला तयार झाले आहेत. प्रशिक्षक निवडण्याच्या समितीमधील सदस्यानेच थेट शास्त्रींना अर्ज करायला सांगितल्याने शास्त्रींची अनिल कुंबळेंच्या जागी प्रशिक्षकपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या लंडनमध्ये असलेल्या रवी शास्त्री यांनी आपण प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचे आधी म्हटले होते. संघ संचालक म्हणून चांगली कामगिरी केल्यानंतरही आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा आरोप शास्त्रींनी केला होता.