सोशल सव्र्हिस लीग, माधवराव भागवत यांना विजेतेपद

By admin | Published: November 25, 2014 01:10 AM2014-11-25T01:10:19+5:302014-11-25T01:10:19+5:30

नुकत्याच पार पडलेल्या मैत्र प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.

Social Services League, Madhavrao Bhagwat won the championship | सोशल सव्र्हिस लीग, माधवराव भागवत यांना विजेतेपद

सोशल सव्र्हिस लीग, माधवराव भागवत यांना विजेतेपद

Next
मुंबई : सोशल सव्र्हिस लीग संघ आणि माधवराव भागवत हायस्कूल संघ यांनी अनुक्रमे मुलांच्या व मुलींच्या गटात शानदार विजयी कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या मैत्र प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या चुरशीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात परळच्या सोशल सव्र्हिस लीग संघाने दादरच्या बलाढय़ शारदाश्रम संघाला 35-23 असे नमवले. मध्यांतराला 11-1क् अशी अवघ्या एका गुणाने नाममात्र आघाडी घेतलेल्या सोशल संघाने विश्रंतीनंतर जोरदार खेळ करताना सहज बाजी मारली. साई जाधव आणि मल्लिकाजरुन महिंद्रकर यांनी आक्रमक चढाया करताना शारदाश्रम संघाला दडपणाखाली आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. तसेच अखिल घाडीगावकरने शारदाश्रमचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला.
मुलींच्या अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात विलेपार्लेच्या माधवराव भागवत हायस्कूल संघाने चुन्नीलाल मेहता हायस्कूल (काळाचौकी) संघाचा 4क्-7 असा तब्बल 33 गुणांनी चुराडा करीत विजेतेपदावर कब्जा केला. मध्यांतरालाच माधवराव भागवत संघाने 17-3 अशी एकतर्फी आघाडी घेताना सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते. तृप्ती जगताप व मिताली कदम हे माधवराव संघाच्या विजेतेपदात चमकल्या तर सानिका आंबवकरने पराभूत संघाकडून झुंजार खेळ केला.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात शारदाश्रम संघाने शिवाजी विद्यालयाचा (काळाचौकी) 38-35 असा पराभव केला. तर सोशल लीग संघाने बलाढय़ ना.म. जोशी मार्ग संघाला 47-17 असे लोळवताना अंतिम फेरी गाठली. मुलींच्या गटात चुन्नीलाल मेहता संघाने प्रभादेवी स्कूलचे आव्हान 38-13 असे सहजपणो परतावले. तर माधवराव भागवतने आपल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर दिगंबर पाटकर संघाचा 5क्-7 असा धुव्वा उडवला. तसेच संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ करणा:या माटुंगा प्रीमियर संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
या वेळी प्रमुख पाहुणो म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस व सिद्धिविनायक मंदिर न्यासचे विश्वस्त धनंजय बरदाडे आणि भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मगदूम यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणो मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सुधाकर घाग, आशियाई सुवर्णपदक खेळाडू नितीन मदने, यू-मुम्बाचा रायडर विशाल माने, जयपूर किंग पँथरचा रोहित राणा यांचीदेखील या वेळी विशेष उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

 

Web Title: Social Services League, Madhavrao Bhagwat won the championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.