Sofiane Loukar Death: भरमैदानात खेळता-खेळता गोलकिपरला आपटला फुटबॉलपटू; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू (Viral Video)
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 05:15 PM2021-12-26T17:15:46+5:302021-12-26T17:17:41+5:30
वेगाने धावत येताना फुटबॉलपटू थेट जाऊन स्वत:च्याच संघाच्या गोलकिपरवर आदळला अन्...
Sofiane Loukar Death: खेळाच्या मैदानात काहीही होऊ शकतं. कोणताही सामना कधीही फिरू शकतो असं म्हणतात. पण खेळाच्या मैदानावर नुकतीच एक वाईट गोष्ट घडली. भरमैदानात फुटबॉल सामना सुरू असताना एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अल्जेरियामध्ये ही घटना घडली. सोफियन लौकर (Sofiane Loukar) असं त्या खेळाडूचं नाव होतं. एका स्थानिक स्पर्धेच्या सेकंड डिव्हिजन सामन्यात सोफियन आपल्याच संघाच्या गोलकिपरवर जाऊन आदळला. त्यानंतकर सोफियनला लगेच हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.
Cezayir takımı Mouloudia Saida'nın kaptanı Sofiane Lokar, maçın ortasında kalp krizi geçirip vefat etti.
— SuperHaber Spor (@superhaberspor) December 25, 2021
Sağlık görevlilerinin saha içerisindeki müdahalesi...https://t.co/CN6oQH6moppic.twitter.com/vNcW48CdqP
अल्जेरियाच्या लीग-२ स्पर्धेदरम्यान हा सामना Mouloudia Saida आणि ASM Oran क्लब यांच्या दरम्यान खेळला जात होता. सोफियनचे वय केवळ २८ वर्षे होते. तो मोलौडिया सैदा या संघाकडून खेळत होता. ग्रुप बी च्या सामन्यात पूर्वार्धाचा खेळ सुरू होता. त्याच वेळी सोफियन स्वत:च्या संघातील गोलकिपरवर आदळला. पण त्यानंतर लगेच काही झालं नाही. त्याच्यावर मैदानात प्रथमोपचार करण्यात आले आणि तो पुन्हा खेळू लागला.
4th soccer player this wk...
— Melly (@Belondyy) December 26, 2021
Algerian player & captain of MC Saida, Sofiane Loukar, collapsed during a game on Sat from an apparent hrt attack
💔 video of his teammates & opposing team in the aftermath, its clear that he was loved by many
What is happening?!! This is not normal! pic.twitter.com/IT1O38l1wP
प्रथमोपचारानंतर सोफियन पुन्हा मैदानात आला आणि त्याने खेळायला सुरूवात केली. १० मिनिटं तो फुटबॉलच्या मैदानात खेळत होता. पण त्यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळताच त्याला रूग्णालयात हलवण्यात आले. पण त्याआधीच त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.