सॉफ्टबॉलचा एकहाती हिरो

By admin | Published: June 22, 2016 03:18 AM2016-06-22T03:18:11+5:302016-06-22T03:18:11+5:30

प्रभावी इच्छाशक्ती असेल तर जन्मजात अपंगत्व असूनही व्यक्तीला उत्तुंग झेप घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डावा हात नसलेला अमरावतीचा अभिजित फिरके एका हाताने

Softball striking heroes | सॉफ्टबॉलचा एकहाती हिरो

सॉफ्टबॉलचा एकहाती हिरो

Next

किशोर बागडे,  नागपूर
प्रभावी इच्छाशक्ती असेल तर जन्मजात अपंगत्व असूनही व्यक्तीला उत्तुंग झेप घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डावा हात नसलेला अमरावतीचा अभिजित फिरके एका हाताने खेळून सॉफ्टबॉलचे मैदान गाजवीत आहे. स्वत:चे घर नाही, वडिलांचे छत्र नाही; पण सहकारी खेळाडूंच्या पाठिंब्यामुळे अभिजितच्या यशाचा आलेख गगनाला भिडतो आहे. भारताला सॉफ्टबॉलमध्ये नवी उंची गाठून देण्याची त्याची जिद्द आहे.
महाराष्ट्र संघातून १३ राष्ट्रीय स्पर्धा, तीन फेडरेशन चषक स्पर्धा, आठ शालेय राष्ट्रीय स्पर्धा आणि भारत-भूतान सॉफ्टबॉल मालिका आदींमध्ये अभिजितचा सहभाग होताच; पण सलग तीन वेळा अ. भा. विद्यापीठ स्पर्धेत खेळून सुवर्णपदक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला हे विशेष. वयाच्या सातव्या वर्षांपासून मैदानावर असलेला अमरावतीच्या गाडगेनगर भागातील २१ वर्षांचा अभिजित शारीरिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आई हॉटेलमध्ये काम करते. मात्र घरातील विपरीत परिस्थिती अभिजितच्या वाटचालीत अडथळा ठरली
नाही. सतत चेहऱ्यावर हसू आणि सकारात्मक वृत्ती जोपासणारा हा खेळाडू सध्या यवतमाळच्या
दर्डा कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशनमध्ये एम.पीएड.च्या द्वितीय वर्षाला शिकतो. पंजाबमध्ये चार दिवसांआधी झालेल्या आठव्या फेडरेशन चषकात महाराष्ट्र चॅम्पियन ठरला. या यशात अभिजितचे योगदान राहिले. दिल्लीत सॉफ्टबॉलची पहिली लीग आयोजित झाली. त्यातही महाराष्ट्र संघातून खेळणाऱ्या अभिजितने प्रभावी खेळाच्या बळावर अनेकांना आपलेसे केले.

सर्वोत्कृष्ट खेळाडू
अभिजितचे साहस आणि आत्मविश्वास मोठा आहे. लहानपणी एका हाताने काम करताना अनेक अडचणी आल्या, पण तो योद्ध्यासारखा लढला. अपंगत्व मागे सारून उजव्या हाताने कॅचेस घेतो आणि चेंडू थ्रोदेखील करतो. इतकेच नव्हे तर होम रनदेखील दमदारपणे घेतो. हे करताना हातातील ग्लोज डोळ्यांची पापणी लागण्याआधीच सफाईदारपणे बदलतो देखील. माझ्या प्रवासात सहकाऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन मोलाचे ठरले, असे अभिजित सांगतो. ‘लोकमत’शी बोलताना तो म्हणाला, ‘फिल्डवर सहकारी खेळाडू आणि कोचचे सातत्याने सहकार्य लाभते.’

अभिजितला
मिळाले घर...
अभिजित दोन वर्षांआधीपर्यंत बेघर होता. महाराष्ट्र सॉफ्टबॉलचे संयुक्त सचिव डॉ. सूरज येवतीकर यांच्या प्रयत्नांनी एक हजार चौरस फुटांचा भूखंड आणि त्यावर घराचे बांधकाम करून ते अभिजितला देण्यात आले. घराचा प्रश्न तर सुटला; पण नोकरीचा कायम आहे.
दिल्लीतील लीगदरम्यान
अमेरिकन दूतावासातील अधिकारी अभिजितच्या खेळामुळे कमालीचे प्रभावित झाले. त्यांनी अभिजितला यापुढील परदेश दौऱ्यात खेळाचा खर्च दूतावास उचलेल, असा शब्द दिला.
या प्रोत्साहनामुळे अभिजित सुखावला आहे. आता तो भारतीय सॉफ्टबॉल संघाच्या परदेश दौऱ्याच्या प्रतीक्षेत कसून सरावात व्यस्त आहे.

Web Title: Softball striking heroes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.