सोनियाचे रौप्य पदकावर समाधान
By admin | Published: May 28, 2016 03:57 AM2016-05-28T03:57:53+5:302016-05-28T03:57:53+5:30
भारतीय बॉक्सर सोनिया लाठेर (५७ किलो) ही शुक्रवारी विश्व महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीची अव्वल खेळाडू एलिसिया मेसियानो हिच्याकडून पराभूत झाल्याने
अस्ताना : भारतीय बॉक्सर सोनिया लाठेर (५७ किलो) ही शुक्रवारी विश्व महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत इटलीची अव्वल खेळाडू एलिसिया मेसियानो हिच्याकडून पराभूत झाल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पदकाच्या चढाओढीत असलेली भारताची एकमेव बॉक्सर सोनियाला १-२ ने पराभूत व्हावे लागले; पण भारतीय पथकाला रिकाम्या हाताने परतण्याची नामुष्की तिच्यामुळेच टळली. हरियाणाच्या २४ वर्षीय खेळाडूने आत्मविश्वासाच्या बळावर सुरुवातीला मेसियानोला मागे टाकले होते; पण मागच्या स्पर्धेत कांस्यावर समाधान मानलेल्या मेसियानो हिने प्रत्युत्तर म्हणून ठोशांनी प्रहार करीत बाजी मारली.
भारताने महिला बॉक्सिंगमध्ये अखेरचे सुवर्ण २०१० मध्ये जिंकले होते. एमसी मेरीकोम हिने ४८ किलो वजन गटात सुवर्ण पटकावित पाचवे विश्वविजेतेपद मिळविले होते.
यंदा मेरीकोम ५१ किलोच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाली. याशिवाय ५१, ६० आणि ७५ किलो वजन गटात एकही खेळाडू रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. २०१४ मध्ये झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत भारताने दोन रौप्य पदके जिंकली.(वृत्तसंस्था)