सोमदेव देववर्मनचा व्यावसायिक टेनिसला रामराम!
By admin | Published: January 1, 2017 01:11 PM2017-01-01T13:11:15+5:302017-01-01T13:12:23+5:30
भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली आहे. 31 वर्षीय सोमदेव याने डेव्हिस चषक आणि ग्रँड स्लॅमस्पर्धांसह राष्ट्रकुल, एशियाड आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. गेल्या काही काळापासून सोमदेव खराब फॉर्म आणि दुखापतींशी झुंजत होता.
आासममध्ये जन्मलेल्या सोमदेवने टेनिसच्या पुरुष एकेरीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत टेनिसच्या पुरुष एकेरीचे सुवर्णपदक पटकावले होते. तसेच त्याचवर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सोमदेवने पुरुष एकेरी आणि दुहेरीत सुवर्णपदकांची कमाई केली होती. त्याबरोबरच सांघिक गटात त्याने कांस्यपदक पटकावले होते. 2011 साली सोमदेवला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत असलेल्या दुखापतींमुळे त्याची कामगिरी खालावली होती.
Somdev Devvarman has announced his retirement from professional #Tennis
— ANI (@ANI_news) 1 January 2017