असे काही झालेच नव्हते....

By admin | Published: August 31, 2016 04:46 AM2016-08-31T04:46:58+5:302016-08-31T04:46:58+5:30

काही दिवसांपूर्वीच रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या चार महिला हॉकी खेळाडूंनी घरी परतताना खाली बसून रेल्वेतून प्रवास केल्याची माहिती देत खळबळ उडवली होती

Something went wrong ... | असे काही झालेच नव्हते....

असे काही झालेच नव्हते....

Next

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या चार महिला हॉकी खेळाडूंनी घरी परतताना खाली बसून रेल्वेतून प्रवास केल्याची माहिती देत खळबळ उडवली होती. मात्र, या प्रकरणी रेल्वेने स्पष्टीकरण देताना हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.
सक्सेना यांनी सांगितले की, ‘हॉकी खेळाडूंनी रांची विमानतळावरून टे्रन पकडली होती, ज्याची कोणतीच पूर्वकल्पना नव्हती. यानंतर टीसीने २० मिनिटांमध्ये खेळाडूंना सीट्स उपलब्ध करून दिल्या. मात्र, हॉकी खेळाडूंना टे्रन पकडण्याची घाई होती, त्यामुळे त्यांनी कोणतीही माहिती दिली नव्हती.’
याशिवाय, ‘टीसीबाबत, खेळाडूंना खाली बसावं लागल्याची माहितीही खोटी असून, रेल्वेने याबाबत चौकशी केली आहे,’ असेही रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. विशेष म्हणजे, प्रसारमाध्यमांमधील माहितीनुसार नमिता टोप्पो, दीप ग्रेस इक्का, लिलिमा मिंच आणि सुनीता लाकडा घरी परतताना रांची ते राउरकेला धावणाऱ्या धनबाद - एल्लेपे एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होत्या. त्या वेळी त्यांना बसण्यास एकही सीट मिळाली नव्हती. त्यांनी टीसीकडे विनंती केल्यानंतरही खेळाडूंना खाली बसून प्रवास करावा लागला.

Web Title: Something went wrong ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.