खो-खोसाठी सोनियाचा दिनु
By admin | Published: February 6, 2015 02:06 AM2015-02-06T02:06:20+5:302015-02-06T02:06:20+5:30
महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन्ही गटांत यजमान केरळचे आव्हान मोडीत काढून सुवर्णपदक पटकावले.
तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन्ही गटांत यजमान केरळचे आव्हान मोडीत काढून सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या रोमांचक लढतीत महाराष्ट्राने केरळवर (६-५-५-५) ११-१० अशी केवळ १ गुणाने मात करून विजेतेपद पटकावले व २०११च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.
केरळने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले, मध्यांतराला महाराष्ट्राकडे १ गुणाची आघाडी होत. सारिका काळे (१.५० मि. व २.२० मि.), प्रियांका येळे (२.४० मि. व १.३० मि.), श्रुती सकपाळ (१.२० मि. व १.२० मि.), ऐश्वर्या सावंत (२.०० मि.),
श्वेता गवळी दोन्ही डावात नाबाद, शीतल भोर (४ बळी) व शिल्पा जाधव (२ बळी) यांनी विजयश्री खेचून आणला.
पुरुषांंनीदेखील केरळचा (१०-७-४-५) १४-१२ असा दोन गुण व ५.१० मि. राखून दणदणीत पराभव केला. अमोल जाधव (२.१० मि. ०.५० मि. नाबाद व ३ गडी), दीपेश मोरे (१.३० मि., २.२० मि. व २ गडी), युवराज जाधव (४ गडी), नरेश सावंत (१.२० मि. व १.१० मि.), उमेश सातपुते (२ मि.), मनोज पवार (२ मि.) तसेच बाळासाहेब पोकार्डे (२ गडी) यांनी अप्रतिम खेळ केला.