उधारीच्या रायफलवर करावा लागायचा सराव, सोनू सूदनं पाठवली अडीच लाखांची रायफल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:16 PM2021-06-30T17:16:53+5:302021-06-30T17:17:30+5:30
अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) यानं कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता खरा अर्थानं गरजूंसाठी देवदूत बनला.
अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood) यानं कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेता खरा अर्थानं गरजूंसाठी देवदूत बनला. सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो आजही गरजवंतांना मदत करत आहे. नुकतंच सोनू सूदनंझारखंडच्या नेमबाजला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक ( Konica Layak ) असे महिला नेमबाजचे नाव आहे आणि तिनं जानेवारी महिन्यात ट्विट करून सोनू सूदकडे मदत मागितली होती. ''११व्या झारखंड राज्य रायफल नेमबाज अजिंक्यपद स्पर्धेत मी रौप्यपदक जिंकले. तरीही सरकारकडून मला काहीच मदत मिळत नाही. मला एक रायफल घेऊन देऊन मदत करा,''असे कोनिकाने आवाहन केले होते.
कोनिका ही झारखंडमधील धनबाद येथे राहणारी आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन वेळा पात्र ठरलेल्या या नेमबाजला प्रशिक्षक किंवा मित्रमेत्रीणींकडून रायफल मागावी लागायची. तिच्या ट्विटला सोनू सूदनं मार्चमध्ये उत्तर दिले आणि लवकरच तिला रायफल मिळेल, असे आश्वासन दिले.
में आपको राइफल दूंगा।
— sonu sood (@SonuSood) March 10, 2021
आप देश को मेडल दे देना।
आपकी rifle आप तक पहुंच जाएगी। @SoodFoundationhttps://t.co/4JFXdrQl2l
''३ लाख किंमत असलेली रायफल मी खरेदी करू शकत नाही. मला माझे प्रशिक्षक आणि मित्रमैत्रीणींवर अवलंबून रहावे लागत होते. मी रायफलसाठी मित्रांच्या मदतीनं ८० हजार रुपये जमा केले आणि १ लाख रुपयांचं लोन काढलं. सुदैवानं सोनू सूद फाऊंडेशननं उर्वरित रक्कमेची मला मदत केली. त्यामुळे मी नवीन रायफलची ऑर्डर देऊ शकले. जर्मन बनावटीची ही रायफल दोन-अडीच महिन्यात माझ्याकडे येईल,''असे कोनिकानं मार्च महिन्यात The Telegraph ला सांगितले होते.
या रविवारी रायफल कोनिकाच्या घरी आली. तिनं त्या रायफलसह फोटो पोस्ट करताना सोनू सूदचे आभार मानले. ''सर माझी बंदूक आली. माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे आणि संपूर्ण गाव तुम्हाला आशीर्वाद देत आहे,''असे तिनं लिहिले. सोनूनंही तिच्या ट्विटला उत्तर दिले आणि म्हणाला, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे सुवर्णपदक निश्चित. आता फक्त प्रार्थनेची गरज आहे.
इंडिया का ओलंपिक मेडल पक्का 🏅
— sonu sood (@SonuSood) June 26, 2021
बस अब दुआओं की जरूरत.@SoodFoundation 🇮🇳 https://t.co/NkoRkDfvAx