सौरव घोषालचे विक्रमी विजेतेपद

By admin | Published: July 18, 2016 10:01 PM2016-07-18T22:01:19+5:302016-07-18T22:01:19+5:30

भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुक्रमे

Sourav Ghoshal's record title | सौरव घोषालचे विक्रमी विजेतेपद

सौरव घोषालचे विक्रमी विजेतेपद

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ -  भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषाल आणि दिपिका पल्लीकल यांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद पटकावले. सौरवला विजेतेपदासाठी हरींदरपाल सिंग संधूविरुद्ध पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. तर, तब्बल ५ वर्षांनी राष्ट्रीय स्पर्धेत खेळत असलेल्या दिपिकाने गतविजेत्या जोश्ना चिनप्पाला चार सेटच्या लढतीत नमवले.
मुंबईतील ओट्टर्स क्लबमध्ये झालेल्या या लढतीत सौरवने पहिला सेट जिंकून आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर हरींदरपालने सलग दोन सेट जिंकताना २-१ अशी आघाडी घेतली. यावेळी काहीसा दबावाखाली आलेल्या सौरवने सावध सुरुवात करताना मोक्याच्यावेळी खेळ उंचावर सौरवने हरींदरपालवर वर्चस्व राखले आणि ११-७, ७-११, ३-११, ११-८, १४-१२ असा झुंजार विजय मिळवत ११व्य्यांदा राष्ट्रीय जेतेपद पटकावले.
दुसरीकडे महिलांमध्ये विक्रमी १५व्या राष्ट्रीय विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या चिनप्पाला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवरातील १९व्या स्थानी असलेल्या दिपिका पल्लीकलने पहिला सेट गमावल्यानंतर नियंत्रित खेळ करताना अग्रमानांकीत आणि गतविजेत्या चिनप्पाला ४-११, ११-६, ११-२, ११-८ असा पराभवाचा धक्का दिला. (क्रीडा प्रतिनिधी)

मी अनेकवेळा राष्ट्रीय फायनल खेळलो आहे. मात्र हरींदरपालविरुध्द खेळणे खूप आव्हानात्मक होते. माझ्यासाठी ही लढत खूप कठीण होती आणि मी त्याचा पुर्ण आनंद घेतला.
- सौरव घोषाल

मी अंतिम लढतीसाठी कोणतीही रणनिती आखली नव्हती. केवळ माझा नैसर्गिक खेळ करताना बाजी मारली. खूप मोठ्या कालावधीनंतर मिळालेल्या या यशाने मी संतुष्ट आहे. या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास वाढला असून राष्ट्रकुल स्पर्धेत माझे सुवर्णपदक कायम राखण्यासाठी मी उत्सुक आहे. यासाठीची तयारी मी सुरु केली आहे.
- दिपिका पल्लीकल

Web Title: Sourav Ghoshal's record title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.